दलालांपासून वाचण्यासाठी मार्केटला माल नेणे गरजेचे : तानाजी चौधरी

विशाल गुंजवटे
Friday, 4 December 2020

दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतीतून चांगले उत्पादन काढतो. मात्र, त्या मालाची विक्री करताना दलालांकडून त्यांची फसवणूक होताना दिसून येत असल्याचे तानाजी चौधरी यांनी सांगितले.

बिजवडी (जि. सातारा) : दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतीतून चांगले उत्पादन काढतो. मात्र, त्या मालाची विक्री करताना दलालांकडून त्यांची फसवणूक होताना दिसून येते. यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल थेट मार्केटला आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन के. डी. चौधरी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी 
संचालक तानाजी चौधरी यांनी केले. 

मोही (ता. माण) येथे के. डी. चौधरी उद्योग समूह पुणे व शेतकरी सचिन देवकर यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी डाळिंब व सीताफळाचे चांगल्या दर्जाचे उत्पादन व विक्री व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र पार पडले. त्या वेळी श्री. चौधरी बोलत होते. शेतीतज्ज्ञ भालचंद्र पोळ यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढायचे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्या वतीने श्री. चौधरी यांचे विशाल गुंजवटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी मंगेश चौधरी, रामचंद्र शिंदे, सुधीर मोरे, दिलीप पिसाळ, बबनराव देवकर, बापूराव देवकर, विठ्ठल डुबल, रामहरी चव्हाण, हरिदास चव्हाण, राजेंद्र देवकर, बाळासाहेब जगदाळे, अशोक भोसले, अक्षय मगर, सस्ते, शिवाजीराव पोळ, हणमंतराव भोसले, गणेश शिंदे, संतोष भोसले आदी शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी डाळिंबविषयक विविध प्रश्न मांडले. त्यावर तज्ज्ञांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. 

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा आंतरपिके घेण्याकडे कल; बटाटा, कांदा, वाटाण्याला सर्वाधिक पसंती

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Workshop For Pomegranate Growers Was Held At Mohi Satara News