esakal | मोदी सरकारनं शेतकरी आंदोलकांना देशोधडीला लावलं; काँग्रेसचा घणाघात I Congress
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj More
जनतेनं सलग दोन टर्म आपल्या हाती मोठ्या विश्वासानं देशाची सत्ता सोपवली.

मोदी सरकारनं शेतकरी आंदोलकांना देशोधडीला लावलं; काँग्रेसचा घणाघात

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : जनतेनं सलग दोन टर्म आपल्या हाती मोठ्या विश्वासानं देशाची सत्ता सोपवली. निवडणुकीपूर्वी आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बदल होईल, ही अपेक्षा होती. त्यानुसार बदलही झाला, पण तो सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात नाही तर केवळ आपल्याच काही मोजक्या मित्रांच्या आयुष्यात झाला. यामुळे जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे, याची आठवण युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे (Congress leader Shivraj More) यांनी आज जागतिक टपाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवून केलीय. याबाबतचं मोरे यांनी ट्विट केलंय.

मोरे यांनी पत्रात म्हटलंय, की जाहीर पत्राच्या माध्यमातून विचारतोय. जनता तुमच्याकडे आशेनं पाहतेय. उत्तर द्या आदरणीय पंतप्रधान, तुम्ही जर उत्तर नाही दिलं तर पाच वर्षांनी जनता अपेक्षित उत्तर देत असते आणि ते नक्की मिळेल. पंतप्रधान म्हणून देशातील प्रत्येक घडामोडीवर आपले लक्ष असतेच, पण पुढे काहीही होत नसल्याचे दिसतं म्हणून काही मुद्द्यांवर या पत्राद्वारे मी आपले लक्ष वेधू इच्छितो! जनतेनं सलग दोन टर्म आपल्या हाती मोठ्या विश्वासानं देशाची सत्ता सोपवली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बदल होईल, ही अपेक्षा होती. त्यानुसार बदलही झाला, पण तो सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात नाही तर केवळ आपल्याच काही मोजक्या मित्रांच्या आयुष्यात झाला. यामुळे जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे.

हेही वाचा: 'त्यांना घेऊन निवडणूक लढवणार असाल, तर तो शरद पवारांचा अपमान असेल'

देशातील तरुण प्रचंड निराश आहे. त्याच्या हाताला काम नाही. आपले मित्र असलेले मोजके उद्योगपती मालामाल तर बाकी छोट्या-मोठ्या उद्योगांचे प्रचंड हाल होत आहेत. उद्योग बंद पडत आहेत. व्यापारी कर्जबाजारी आणि शेतकरी देशोधडीला लागलाय. देशात बिनदिक्कतपणे घुसखोरी होतेय.. पेट्रोल-डिझेल, घरगुती सिलिंडरचे दर आकाशाला भिडले. महागाईने सामान्य जनता बेहाल झाली, पण आपल्याला जराही तमा दिसत नाही. लोकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करता येत नाही. शेतकरी आंदोलकांना भरदिवसा गाडीखाली चिरडलं जातं. जगणं महाग झालंय आणि मरण स्वस्त झालंय, असं म्हणावं लागेल, असा घणाघातही मोरे यांनी मोदी सरकारवर केला आहे.

हेही वाचा: कोकणच्या समृद्ध विकासासाठी राजकारण बाजूला सारुन एकत्र या

loading image
go to top