मायणीतील 'ही' संस्था वडूजची इमारत विकून देणार ठेवीदारांना पैसे
मायणी (जि.सातारा) : अवसायानात गेलेल्या यशोदीप पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत करण्यासाठी संस्थेची वडूज येथील इमारत विकण्याची परवानगी संस्थापक माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना मिळाली आहे. जिल्हा उपनिबंधक यांनी अटी शर्तींवर इमारत विक्रीची परवानगी दिली आहे.
पार्ले गावातील 'ही' समस्या अखेर मार्गी
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी यशोदीप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची मायणीत स्थापना करून खटाव व माण तालुक्यांत ठिकठिकाणी शाखा सुरू केल्या होत्या. मात्र, संस्था अवसायानात गेली. सुमारे 40 कोटी ठेवी असणारी संस्था ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास असमर्थता दाखवू लागली. अखेर ठेवीदारांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला. काही जण ग्राहक मंचाकडे गेले, तर काही ठेवीदारांनी फौजदारी गुन्हे दाखल केले. त्या सर्वच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी संस्थेकडे पैसा नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून संस्थेची वडूज शाखेची इमारत संचालक मंडळाने विक्रीसाठी काढली आहे. त्यासाठी यशोदीपचे संस्थापक डॉ. येळगावकर यांनी राज्याच्या सहकार व पणनमंत्र्यांकडे अर्ज केला होता.
पाडळीतील आजींना त्यांनी विचारले बरं हाय का, अन् पळविले लाखांचे दागिने
त्यानुसार वडूज येथील सिटी सर्व्हे नंबर 1477 क्षेत्र 101.02 चौ. मी. व सिटी सर्व्हे नंबर 1476 मधील क्षेत्र 11.1 चौ. मी. मिळकत आहे. ती विकून सुमारे दोन कोटी रुपयांच्या ठेवी परत देऊ शकतो, असे नमूद केले आहे. दरम्यान, मंत्री महोदयांच्या मान्यता पत्रासोबत डॉ. येळगावकर व खटाव तहसीलदारांचे पत्र यांचा संदर्भ देत जिल्हा उपनिबंधकांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 चे कलम 36 अन्वये काही अटी-शर्तीवर मिळकत विक्रीची परवानगी दिली आहे. वाजवी मूल्यांकन अथवा रेडीरेकनर यापैकी अधिकच्या किमतीला, जाहीर लिलावाद्वारे मिळकत विकावी. विक्रीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग ठेवीदारांना देण्यासाठीच करावा. अशा विविध अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.
धरण भरलयं; पण शेतकऱ्यांवर पाणी-पाणी करण्याची वेळ
संपादन : संजय शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.