Yashwantrao Chavan : मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून यशवंतराव चव्हाणांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan

Yashwantrao Chavan : मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून यशवंतराव चव्हाणांना अभिवादन

कऱ्हाड : कृषी व औद्योगिक विकासातून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालण्याचे काम केले. त्यांना सरकारतर्फे अभनवादन करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज त्यांच्या समाधीस्थळी जावून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अ्य मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते चव्हाण यांची ३८ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त अनेकांनी त्यांच्या समाधीस्थळी जावून त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री देसाई, माजी मुख्यमंत्री चव्हाण, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, प्रभाकर देशमुख, भाजपचे प्रदेश सचिव अतुल भोसले, पुरूषोत्तम जाधव, माजी सभापती देवराज पाटील, राष्ट्रवादीचे नंदकुमार बटाणे, कॉग्रेसचे भानुदास माळी यांच्यासह राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नेते य़सवंतराव चव्हाण यांनी महाराष्ठ्राचा मंगल कलश आणला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने औद्योगिक व कृषी विकास साधाला. त्यामुळे आज राज्य त्यांच्या विचारवर चालतो आहे. त्यामुळे त्यांच्या समाधी स्थळी शासकीय अधिकारी व राज्य सरकारतर्फे अभिवादन करत आहोत.