'आरक्षणाचा मुद्दा न सोडविल्यास ठाकरे सरकारला किंमत मोजावी लागेल'

OBC Reservation
OBC Reservationesakal
Updated on

सातारा : ओबीसी समाजाचे (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसल्यामुळेच सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे सरकारने (Thackeray Government) केवळ बघ्याची भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपचे ओबीसी मोर्चा (BJP OBC Morcha) प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनी पत्रकाद्वारे केला.

Summary

आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली.

या अगोदर आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आणि आता तोच पाढा पुन्हा गिरविण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी तातडीच्या बैठकीचे नाटक ठाकरे सरकारने केले. पण, या बैठकीत सरकारने कोणताही प्रस्ताव न ठेवता केवळ विरोधकांची मते जाणून घेतली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित न होण्यासाठी ठाकरे सरकार निर्णयात टाळाटाळ करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

OBC Reservation
'मोदींचा इस्राईल दौरा' हा देशावरील सायबर हल्ला

फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात पाच समित्या स्थापन करून मागासलेपणासंबंधीचा अहवाल तयार करण्यात आला होता. त्याच धर्तीवर ओबीसी आरक्षणासंबंधात इंपिरिकल डेटा तयार करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अधिक अस्थिर केला. निवडणुकांअगोदर आरक्षणाचा मुद्दा सकारात्मकरित्या न सोडविल्यास त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही श्री. टिळेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Witnesses Unusual Shiv Sena Protest Over Price Rise and Fuel Hike
Electric Shock Claims Life of Farmer During Pump Installation in Satara District
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Eyes on Loan Waiver Rules: State Government Preparing New Relief Plan for Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com