
कऱ्हाड : चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव (ता. वाळवा) येथील युवकास अपहरण करून लोखंडी पाइप, दांडक्याने बेदम मारहाण झाली. त्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी यापूर्वी सात जणांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एकास अटक केली आहे. उदय पाटील (वय ४६) असे या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.