बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू 

फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन लोणंद पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांना गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू 

लोणंद (जि. सातारा) : पत्नीस मेसेज का करतो या कारणावरून चिडून येथील दहा ते बारा जणांनी संगनमताने लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. सूरज बापूराव धायगुडे (वय 23, रा. बाळूपाटलाची वाडी, ता. खंडाळा) असे मृताचे नाव आहे. साेमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लोणंद येथे समाधान ढाब्यासमोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी 12 ते 15 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंदनजीक गोटेमाळ येथील समाधान ढाब्यावर सूरज धायगुडे यास संशयितांपैकी एकाच्या पत्नीस मॅसेज का करतो या कारणावरून चिडून रोहित धनावडेने मोटारसायकलवर बसवून समाधान ढाबा येथे नेले. तेथे रोहित धनावडे, राकेश माने, गणेश भालेराव, ढाब्याचे मालक मंगेश (आबा) क्षीरसागर व त्यांचा भाऊ राजेश क्षीरसागर, कामगार योगेश कांबळे व अन्य सात ते आठ अनोळखींनी सूरजला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यास पहाटे तीन वाजण्याचे सुमारास लोणंद एसटी स्टॅंडसमोर आणून टाकले. दरम्यान, सूरजला उपचारासाठी पुण्याला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सूरजचे चुलते राघू धायगुडे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संशयितांना अटक करण्यासाठी धडपड
 
फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन लोणंद पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांना गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, संशयितांना अटक करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, बाळूपाटलाचीवाडीतील ग्रामस्थांनी लोणंद पोलिस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. 

दिल्लीच्या जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद विद्यापीठ होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती

Positive Story : प्लॅस्टिकच्या समस्येवर सातारकरांनी शोधला नवा उपाय; युवकांच्या स्टार्टअप प्रयत्नांना मोठं यश

खुशखबर! UPSC उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी; केंद्र सरकारचा परीक्षार्थींना मोठा दिलासा

सत्ताधारी पक्षाचाच आमदार असल्याने शिक्षकांचे प्रश्न सुटणार : जयंत आसगावकर

Edited By : Siddharth Latkar

Web Title: Youth Died Fighting Near Lonand Satara Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Thane
go to top