
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील दाढोली- गुजरवाडी घाटातील पहिल्याच वळणावर झालेल्या चारचाकी व दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार झाला. राहुल संजय पवार (वय ४३, रा. साईदर्शन कॉलनी, सैदापूर, ता. सातारा) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.