हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubham Sartape

हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार

म्हसवड - वादळी वारा व पाऊस सुरू असताना जनावरांच्या गोठ्यानजीकच्या ट्रान्स्फार्मरवर वीज पडून पत्राशेडच्या लोखंडी अँगलला वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून युवकासह व म्हशीचा जागीच मृत्यू झाला. हिंगणी (ता. माण) येथे गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ही घटना घडली. गुरुवारी (ता. १९) रात्री माण तालुक्यात सर्वत्र मॉन्सून पूर्व पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. शुभम सरतापे (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे.

हिंगणी येथील शेतकरी लालासो दाजी सरतापे (वय ७५) हे पत्नी, सौरभ, दुसरा मुलगा शुभम यांच्यासोबत एकाच घरात एकत्र राहात होते. रात्री दहाच्या दरम्यान विजांचा कडकडाटासह पावसाचा जोर वाढला. राहत्या घरालगतच पत्र्याचे छप्पर असलेल्या जनावराच्या गोठ्यातून जनावरे ओरडत असल्याचा आवाज येत आहे म्हणून शुभम हा गोठ्यात जनावरे पाहायला गेला असताना घराच्या मागील बाजूस असलेल्या वीज वाहिनीच्या ट्रान्स्फार्मरवर (डीपी) वीज पडल्याने पत्र्याचे शेड असलेल्या गोट्याला विजेचा धक्का बसू लागला. त्यामुळे गोठ्यात बांधलेली जनावरे दावण तोडून गोठ्यातून बाहेर पडली होती.

याच गोठ्यात बांधलेल्या एका म्हशीचे दोर जाड असल्याने तो तुटू न शकल्याने त्या म्हशीला विजेचा शॉक बसत असल्याने ती जोरात ओरडत होती. शुभमने तिच्याजवळ जाताना पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला धरले. त्यावेळी शुभमलाही जोरदार विजेचा झटका बसून तो खाली पडला. दुसरीकडे त्याचवेळी विजेच्या झटक्याने म्हशीचाही मृत्यू झाला. पावसाची रिपरिप व रात्रीची वेळ असल्यामुळे या घटनेची माहिती काल (ता. २१) सकाळी शुभमच्या वडिलांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली.

Web Title: Youth Killed Electric Shock In Hingani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top