
-अमर वांगडे
परळी : इच्छा असेल तर मार्ग दिसेल अन् तळमळ असेल तर कार्यसिद्धीचा आनंद मिळेल, असे म्हणतात. याचाच प्रत्यय परळी खोऱ्यातील दुर्गनाद प्रतिष्ठानच्या कार्यातून येत आहे. ‘झोपेतील एक तास झाडांसाठी’ या उद्देशाने सर्व सदस्य एकत्रित येत सज्जनगडावरील वृक्षसंपदा मोठ्या काळजीने डोलवत आहेत. परळी येथील काडसिद्धेश्वर मठापासून पायरी मार्गाने वर जात ते पायथ्यावर वृक्षारोपण केलेल्या झाडांना पाणी देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.