'मी जीव देऊन तुम्हाला कामाला लावतो,' असे म्हणत संशयिताने पाेलिसांसमाेर आपटले डाेके

प्रवीण जाधव
Monday, 11 January 2021

एलसीबीचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सातारा : चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयिताने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) कार्यालयातच डोके भिंतीवर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अक्षय लालासो पवार (वय 25, रा. खंडोबाचा माळ, सातारा) असे त्या संशयीताचे नाव आहे. कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने अक्षयला ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी त्याला एलसीबीच्या पोलिस मुख्यालयात असलेल्या कार्यालयात आणले होते. 

शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा

चौकशी दरम्यान 'मला आता जगायचे नाही, मी जीव देऊन तुम्हाला कामाला लावतो,' असे म्हणून त्याने एलसीबीच्या कार्यालयातील भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर एलसीबीचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षयवर गुन्हा दाखल करण्या आला आहे. हवालदार बी.एस सणस तपास करत आहेत.

Edited By : Siddharth  Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth From Satara Hurt Himself In Police Station Crime News

Tags
टॉपिकस
Topic Tags: