कोयना धरणावरील महाकाय अजगराचा युवकांनी वाचविला जीव

विजय लाड
Tuesday, 1 December 2020

पाटण तालुक्‍यात आजपर्यंत जी अजगरे सापडली आहेत, ती कोयना अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये सोडण्यात येतात. यामुळे वन्यप्राण्यांचा वावर सगळीकडे होताना दिसत आहे.

कोयनानगर (जि. सातारा) ः कोयना धरणाची मोहिनी प्रत्येकाला आहे असे वाटते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी व तांत्रिक अभियांत्रिकीचा अविष्कार असणारे कोयना धरण पाहण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. परंतु, महिन्यापूर्वी कोयना धरणावर बिबट्याने "एंट्री' करून जरब निर्माण केली असतानाच रविवारी चक्क एका महाकाय अजगराने धडक देवून कोयना धरणावर दर्शन दिले आहे.

या अजगराने कोयना धरणावर "एंट्री' केल्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र वन्यजीव विभागाच्या जॉंबाज सर्पमित्रांनी जिवाची पर्वा न करता अजगर पकडल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे.
मराठा विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकला खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय

कोयना धरण माथ्यावर धरणाच्या भिंतीच्या मधोमध सात फुटी अजगर अडकला असल्याचे कोयना धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे एकच घबराट पसरली. धरणाच्या भिंतीमध्ये मधोमध अडकलेल्या या अजगरास बाहेर काढणे हे अत्यंत जोखमीचे काम होते. यावेळी वन्यजीव विभागाचे सर्पमित्र विकास माने व अश्वजित कदम यांनी जोखीम पत्करून अजगरास बाहेर काढून जीवदान दिले.

जवळजवळ एक तास यासाठी प्रयत्न सुरू होते. सर्पमित्रांनी अजगर जिवंत पकडून त्याला जीवदान दिल्यानंतर थरकाप उडालेल्या कोयना प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कोयना अभयारण्यात कोयना धरण परिसराचा समावेश होतो. पाटण तालुक्‍यात आजपर्यंत जी अजगरे सापडली आहेत, ती कोयना अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये सोडण्यात येतात. यामुळे वन्यप्राण्यांचा वावर सगळीकडे होताना दिसत आहे.

उदयनराजेंचे हे म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Saved Life Of Python Near Koyna Dam Satara News