शिरवड्यात रुजतेय वृक्ष संवर्धनाची चळवळ; 'मागेल त्याला मोफत झाड' योजनेच फलित

शिरवड्यात रुजतेय वृक्ष संवर्धनाची चळवळ; 'मागेल त्याला मोफत झाड' योजनेच फलित

शिरवडे (जि. सातारा) : वृक्षसंवर्धनाचा वसा, वारशाच्या गोष्टी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात जपल्या जात आहेत. त्याच विचार धारेतून शिरवडेसारख्या छोटेखानी गावातही वृक्षसंवर्धनाचा उपक्रम आकार घेतो आहे. निवृत्त सैनिक सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकवटले आहे. त्यात आबालवृद्धांचा सहभाग आहे. विशेष करून युवकांसह माजी सैनिकांचे संघटन त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे मागेल त्याला वृक्ष देऊन त्याच व्यक्तीकडून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची शपथ ते घेत आहेत. 

शिरवडे गावात वृक्षसंवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. त्या एकमुखी निर्णयाची अंमलबजावणी निवृत्त अधिकारी बाजीराव जगदाळे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. संकल्प केल्यापासून एकही रविवारी वृक्षारोपणात आजअखेर खंड पडलेला नाही. मागेल त्याला मोफत झाड संकल्पना सुरू झाल्यापासून गावातील निम्म्याहून अधिक घरासमोरील अंगणात झाडे लावली आहेत. माजी सैनिक सतीश पाटील, राजेंद्र बोराटे, संतोष मार्कळ, नामदेव जगदाळे, जयंत गायकवाड, वैभव जगदाळे, रोहन जगदाळे, ऋषिकेश पाटील, गणेश जगदाळे सर्वांनी आजअखेर 200 झाडांची लागण केली आहे. त्यात गुलमोहर, वड, पिंपळ, जांभळ, आंबा, चिंच, लिंब, चाफा, पेरू झाडांचा समावेश आहे. प्रत्येक रोपाची लागण केल्यानंतर लगेच त्याठिकाणी संरक्षक जाळी बसवली जाते. झाडांची निगा राखताना प्रामुख्याने पाणी घालणे, आळी करणे, काठ्या लावणे, खत घालणे कामे गटांच्या नियोजनातून केली जातात. तळबीड येथील वसंतगडावरही 35 झाडांची लागण केली आहे. अविनाश जगदाळे, माजी सरपंच सर्जेराव थोरात, सतीश जगदाळे व काही ग्रामस्थांनीही हा उपक्रम राबविण्याचा निश्‍चय केला आहे. 

देशसेवेसह सामाजिक बांधिलकी जपताना गावातही असे सार्वजनिक उपक्रम घेण्याचा विचार जपत आहोत. प्रत्येक रविवारी वृक्षारोपण, संवर्धनाबरोबरच स्वच्छता अभियानही स्वयंस्फूर्तीने राबविण्यात येते. 
-सतीश पाटील, निवृत्त सैनिक, शिरवडे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com