Rapid Charging : आता बिनधास्त घ्या इलेक्ट्रिक गाडी! केवळ १५ मिनिटात होणार चार्ज; भारतीय कंपनीचं नवीन तंत्रज्ञान!

EV Rapid Charging : चार्जिंगला वेळ लागतो म्हणून कित्येक जण ईव्ही घेणं टाळतात.
EV Rapid Charging
EV Rapid ChargingeSakal

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, एक मोठा वर्ग असा आहे जो या कार्सकडे पाठ फिरवतो. प्रदूषण कमी करण्यासाठी ईव्ही घेण्याचा विचार तर बरेच जण करतात; मात्र त्याच्या चार्जिंगसाठी लागणारा वेळ आणि रेंज पाहून मग तो विचार बदलतात.

बंगळुरूमधील एका कंपनीने आता हीच समस्या सोडवली आहे. एक्स्पोनेंट एनर्जी नावाच्या कंपनीने एका रॅपिड चार्जिंग टेकनिकचा शोध लावला आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक वाहन केवळ १५ मिनिटांमध्ये चार्ज करता येणं शक्य होणार आहे.

EV Rapid Charging
Electric Scooter : ओला, एथर अन् हिरोच्या EVs कडे खरेदीदाराची पाठ! नेमकं का मंदावली इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री?

तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली एक्स्पोनेंट एनर्जी ही कंपनी सध्या तीन गोष्टींवर काम करत आहे. यामध्ये ई-पॅक (बॅटरी पॅक), ई-पंप (चार्जिंग स्टेशन) आणि ई-प्लग (चार्जिंग कनेक्टर) यांचा समावेश आहे. या गोष्टींच्या मदतीने अगदी मोठ्या बसची बॅटरीही केवळ १५ मिनिटांमध्ये फुल चार्ज होऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. (Electric Vehicle Charging)

असं आहे तंत्रज्ञान

लिथियम प्लेटिंग आणि वाढणारी हीट ही आपल्यासमोरील मुख्य आव्हानं होती, असं कंपनीने सांगितलं आहे. एक्स्पोनेंट एनर्जीने (Exponent Energy) तयार केलेली बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (BMS) ही व्हर्चुअल सेल मॉडेल आणि डायनॅमिक चार्जिंग अल्गोरिदमचा वापर करते. या माध्यमातून फास्ट चार्जिंगवेळी लिथियम प्लेटिंगमुळे होणारं सेल डिग्रेडेशन रोखता येतं.

EV Rapid Charging
Thar Electric : आता येणार इलेक्ट्रिक थार! 15 ऑगस्टला महिंद्रा सादर करणार डिझाईन; 'हे' असतील फीचर्स

बॅटरी होणार नाही गरम

फास्ट चार्जिंगवेळी बॅटरी वेगाने गरम होण्याचा प्रकारही दिसून येतो. यामुळे कित्येक ईव्हींमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कंपनीने तयार केलेल्या HVAC सिस्टीममुळे फास्ट चार्जिंगवेळी निर्माण होणारी हीट कमी होते.

या सिस्टिममध्ये लिथियम-आयन सेलला थंड ठेवण्यासाठी रेफ्रिजिरेटेड पाण्याचा वापर होतो. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अ‍ॅम्बियंट तापमान हे 35 अंश सेल्सिअसच्या वर जात नाही. यामुळे बॅटरी अधिक गरम होण्यापासून रोखता येतं.

EV Rapid Charging
Electric Cars : हुशार असाल तर 2025 आधी इलेक्ट्रिक कार खरेदी करू नका, खुद्द कियाच्या नॅशनल हेडने सांगितलं कारण

बंगळुरूमध्ये उभारले चार्जिंग स्टेशन

एक्स्पोनेंट कंपनीने गेल्या तीन महिन्यांमध्ये बंगळुरूमध्ये २५ हजारांहून अधिक रॅपिड चार्जिंग सेशन पूर्ण दावा केला आहे. यामध्ये कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून २०० हून अधिक वाहनांना चार्ज करण्यात आलं आहे. सध्या बंगळुरूमध्ये कंपनीचे ३० चार्जिंग स्टेशन आहेत. यातील २० स्टेशन हे फ्रँचायजी मार्फत चालवले जातात. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com