हिरो घेऊन येतेय स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; मिळतील अनेक दमदार फीचर्स

2022 hero optima cx electric scooter brochure leaks launch soon check details here
2022 hero optima cx electric scooter brochure leaks launch soon check details here

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची वाढती किंमत लक्षात घेता लवकरत हिरो इलेक्ट्रिक नवीन स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनी आपली Optima CX सीरीज अपग्रेड करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी या स्कूटर्सची ब्रोशर लीक झाली आहेत. या स्कूटर्स CX आणि CX ER (एक्सटेंडेड रेंज) या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केल्या जातील. Hero Electric च्या अधिकृत वेबसाईटने सध्याचे CX दिल्लीत 62,190 रुपयांच्या किंमतीला लिस्ट केले आहे.

नवीन Hero Optima CX हे त्याच्या सध्याच्या मॉडेल Optima HX सारखेच असण्याची शक्यता आहे, परंतु फीचरच्या बाबतीत ते वेगळे असू शकते. असे मानले जाते की Hero Optima CX मागील मॉडेलपेक्षा 25 टक्के अधिक शक्तिशाली असेल.

याशिवाय, त्याची इलेक्ट्रिक मोटरची कार्यक्षमता पूर्वीपेक्षा 10 टक्के जास्त असेल, ज्यामुळे त्याचा टॉप स्पीड देखील जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच, मोठी बॅटरी असल्याने त्याची रेंजही पूर्वीपेक्षा जास्त असणार आहे.

2022 hero optima cx electric scooter brochure leaks launch soon check details here
लॉंच होताच कार ठरली हीट! एकाच महिन्यात 10 हजारांहून जास्त बुकिंग

Optima सीरीज 52.2V, 30Ah लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरीसह येते. तर CX बेस व्हेरियंटला एक युनिट मिळते जे 82 किमीची रेंज देते तर CX ER दुहेरी बॅटरीसह ऑफर केले जाईल जे एका चार्जवर 140 किमीची एकत्रित रेंज देते. या दोन्ही स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतील.

2022 hero optima cx electric scooter brochure leaks launch soon check details here
'तुम्हाला एडिट बटण हवंय का?'; एलन मस्कच्या पोलवर CEO अग्रवाल म्हणाले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com