

California Senate Bill 867AI toys parents warning
esakal
पालकांनो सावधान व्हा..आजकाल बाजारात येणारी AI चॅटबॉट असलेली खेळणी तुमच्या लहान मुलांसाठी सुखाचा साथीदार वाटतात, पण त्यामागे लपलेले धोके खूप मोठे आहेत. हॅकिंग, लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम, त्यांना इंफ्लुएंसमध्ये आणणे यासह अनेक धोके आहेत. कॅलिफोर्नियाचे सिनेटर स्टीव्ह पॅडिला यांनी नुकतेच सिनेट बिल ८६७ मांडले आहे. या विधेयकानुसार १८ वर्षांखालील मुलांसाठी AI चॅटबॉट असलेल्या खेळण्यांच्या निर्मिती आणि विक्रीवर चार वर्षांची बंदी घालण्यात येईल.