32 Inch Smart TV : या कंपनीने लॉन्च केला स्वस्त टीव्ही, कमी किमतीत मिळणार दमदार फीचर्स

नवीन टीव्ही iFFALCON S53 मध्ये 32-इंच एलईडी स्क्रीन
32 Inch Smart TV
32 Inch Smart TVesakal

32 Inch Smart TV : तुम्हाला स्मार्ट खरेदी करायचा असेल पण बजेटमध्ये येणारा नवीन टीव्ही घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. नवीन टीव्ही iFFALCON S53 मध्ये 32-इंच एलईडी स्क्रीन आहे आणि त्याची किंमत 14,000 रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून अनेक बँक ऑफरचा लाभ घेऊ शकता.

32 Inch Smart TV
IPL 2023 Livestream : विना अडथळा मॅच बघण्यासाठी असा वाढवा WiFi चा स्पीड

iFFALCON S53: iFFALCON S53 मध्ये 32-इंचाचा LED स्क्रीन आहे. याचे HD रिझोल्यूशन 1,366 x 768 पिक्सेल आहे. स्क्रीन स्लिम बेझल्ससह येते आणि डायनॅमिक कलर एन्हान्समेंट अल्गोरिदमसह HDR10 ला सपोर्ट करते.

32 Inch Smart TV
Amazon Discount : आता अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी

ऑडिओच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या स्मार्ट टीव्ही मध्ये डॉल्बी ऑडिओसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत जे 24W आउटपुट तयार करतात. iFFALCON S53 TV ऑनबोर्ड G31 MP2 GPU सह 64-बिट क्वाड-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

32 Inch Smart TV
Top 5 Sedan Cars : आता 8 लाखात खरेदी करा या सेडान कार्स

iFFALCON S53 च्या कनेक्टिव्हिटी ऑप्शन मध्ये ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5, दोन HDMI पोर्ट, एक USB पोर्ट आणि इथरनेट पोर्ट यांचा समावेश आहे. स्मार्ट टीव्ही व्हॉइस सक्षम रिमोटसह येतो आणि यात OTT स्ट्रीमिंग अॅप्स ही इंस्टॉल केलेले आहेत.या स्मार्ट टीव्हीमध्ये Chromecast आणि स्क्रीन मिररिंग सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

32 Inch Smart TV
Poco C51 : पोकोचा नवीन स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या Poco C51 च्या फीचर्सबद्दल

हे नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार इत्यादी इनबिल्ट OTT अॅप्ससह येतो.iFFALCON S53 टीव्हीची किंमत 12,999 रुपये आहे. जर तुम्हाला हा टीव्ही घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. यजरस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांच्या तात्काळ सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com