esakal | FB-इन्स्टाच्या जाळ्यात भारताचं भविष्य; 10 वर्षांच्या मुलांना घातलाय विळखा
sakal

बोलून बातमी शोधा

facebook app

FB-इन्स्टाच्या जाळ्यात भविष्य; 10 वर्षांच्या मुलांना घातलाय विळखा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

अगदी लहानापासून तर सत्तरी ओलांडलेल्या व्यक्‍तींपर्यंत प्रत्येकजण आज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय दिसतोय. नाते, मैत्री इथपर्यंत मर्यादित असलेलं हे माध्यम राहणीमान बदलण्यापासून तर अजेंडा बदलण्यापर्यंत पोहोचलं आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी माणसाने अपडेट राहणं गरजेचंच आहे. मात्र त्याच्या आहारी जाणं तेवढंच धोक्‍याचं आहे. भारताचं भविष्य फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशळ मीडियाच्या जाळ्यात अडकल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी माहिती समोर आली आहे.

बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या (NCPCR) सर्व्हेनुसार, भारतामधील 10 वर्षांची 37.8 टक्के मुलांचं फेसबुक खातं आहे तर 24.3 टक्के मुल इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहेत. NCPCR च्या मते वरील रिपोर्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मद्वारे तयार करण्यात आलेल्या नियमांच्या बाहेर आहे. सोशल मीडियावर वापर करण्यासाठी वयाची अट घालून दिलेली आहे, असं असतानाही चिमुरडी फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम खातं उघडण्याची वयोमर्यादा 13 वर्ष करण्यात आलेली आहे, तरिही 10 वर्षांची मुलं दोन्ही प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहेत.

मोबाइल आणि इतर गॅझेटचा मुलांवर होणारा परिणाम, या विषयाच्या आधारावर मुलांचा सर्वे करण्यात आला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, 10 वर्षांची मुलं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या पालकांच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहतात.

बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) पाच हजार 811 लोकांचा सर्वे केला होता. यामध्ये 3491 मुलं, 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळा यांचा समावेश होता. जास्त वेळ मोबाइल वापरणं मुलांसाठी धोकादायक असतात, असेही आपल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

loading image
go to top