थ्रीडी प्रिंटेड सिरॅमिक लवकरच 

3D printed Ceramic soon
3D printed Ceramic soon
Updated on

प्रिटिंगचा वापर अनेक क्षेत्रांत वाढत असून, संशोधकांनी आता थ्रीडी प्रिंटिंगच्या साह्याने मजबूत सिरॅमिक निर्माण करण्याची पद्धत विकसित केली आहे. नेहमीच्या सिरॅमिकच्या तुलनेत याला तडा जाण्याची शक्‍यता कमी असेल, असा संशोधकांचा दावा आहे. कॅलिफोर्नियातील एचआरएल लॅबोरेटरीजमधील अभियंते जॅक इकेल आणि त्यांच्या सहकारी यावर काम करत आहेत ."सायन्स'या नियतकालिकात त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांनी सिलिकॉन आणि ऑक्‍सिजनवर आधारित पॉलिमर्सचा वापर केला. संशोधकांनी बनविलेल्या सिरॅमिकचे इलेक्‍ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेखाली विश्‍लेषण केले.

या वेळी, या सिरॅमिकच्या पृष्ठभागावर तडे नसल्याचे आढळले. आणखी चाचण्या घेतल्यानंतर हा सिरॅमिक पदार्थ तडा जाण्यापूर्वी 1400 अंश तापमानापर्यंत तग धरू शकत असल्याचे आढळले. जेटइंजिनापासून फॉर्म्युला वनमधील कारचे ब्रेक तयार करण्यासाठी सिरॅमिकचा वापर केला जातो. त्यामुळे, थ्रीडी प्रिंटेड सिरॅमिकमुळे या क्षेत्रांमध्ये क्रांती होऊ शकते. सिरॅमिकची उच्च तापमानाला स्थिर राहणे,मजबुती आदी वैशिष्ट्ये असली, तरी पॉलिमर आणि इतर काही धातूंप्रमाणे सिरॅमिकचे कण उष्णता दिल्यावर एकत्र येत नाहीत. नव्या थ्रीडी तंत्रज्ञानातून यावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com