Smartphone Apps: फोनमधील हे ४ अ‍ॅप्स त्वरित करा डिलीट, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apps

Smartphone Apps: फोनमधील 'हे' ४ अ‍ॅप्स त्वरित करा डिलीट, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे

Dangerous Android apps: स्मार्टफोनमध्ये आपण अनेक वेगवेगळे अ‍ॅप्स डाउनलोड करत असतो. मात्र, यातील काही अ‍ॅप्स धोकादायक असण्याची शक्यता आहे. काही धोकादायक अ‍ॅप्सची माहिती समोर आली असून, हे अ‍ॅप्स जर तुम्ही डाउनलोड केले असल्यास त्वरित डिलीट करायला हवे आहे. या अ‍ॅप्सला गुगल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहे. पंरतु, त्याआधी जवळपास १० हजार वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्वरित डिलीट करा हे अ‍ॅप्स

तुमच्या फोनमध्ये FileVoyager, X-File Manager, LiteCleaner M आणि PhoneAID Cleaner Booster 2.6 हे अ‍ॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा. अन्यथा फोनमधील तुमची खासगी माहिती चोरी होऊ शकते.

हेही वाचा: Jio 2GB Daily Recharge : कमी किंमतीत दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल; जाणून घ्या सर्व प्लॅन

धोकादायक आहेत हे अ‍ॅप्स

रिपोर्टनुसार, हे चारही अ‍ॅप्स बँकिंग ट्रोजन मॅलवेयरला डिव्हाइसमध्ये इंस्टॉल करण्याचे काम करतात. या बँकिंग ट्रोजनला शार्कबॉटच्या नावाने ओळखले जाते. अशाप्रकारची जवळपास १६ हजार प्रकरणं समोर आली आहेत. शार्कबोट मॅलवेयर हे बँकिंग डेटा चोरी करण्याचे काम करतात. यासाठी यूजर्सच्या फोनमधील डेटा कलेक्ट करण्याची परवानगी घेतली जाते. त्यानंतर मॅलवेयर बँकिंग अ‍ॅप्सला कंट्रोल करून लॉगइन डेटा चोरी करतात.

ब्रिटन, इटली, ईराण आणि जर्मनीमध्ये या अ‍ॅप्सच्या माध्यमातून फोनमधून डेटा चोरी झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. तुम्ही देखील यापैकी एखाद्या अ‍ॅपचा वापर करत असाल तर त्वरित डिलीट करा. Google ने या अ‍ॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले आहे. मात्र, ज्या यूजर्सने आधीच अ‍ॅप्सला डाउनलोड केले आहे. त्यांच्या फोनमधील डेटा चोरी होत आहे. यामुळे तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते.

टॅग्स :Technology5G Smart Phone