
पावसाळ्यात इलेक्ट्रिक कार सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ चार्जर वापरा आणि कार कव्हरखाली पार्क करा.
बॅटरी आणि त्याच्या जोडण्या नियमित तपासा, जेणेकरून पाण्यापासून त्यांचे संरक्षण होईल.
पाणी साचलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवणे टाळा आणि कार स्वच्छ ठेवून इलेक्ट्रॉनिक्सचे नुकसान टाळा.
How to keep electric car safe in monsoon season: पावसाळा हा अनेकांचा आवडता. पण हा ऋतू कार मालकांसाठी खूप आव्हानात्मक असतो, कारण पावसामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या ऋतूत इलेक्ट्रिक कारचे नुकसान होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमची संवेदनशीलता लक्षात घेऊन, त्यांच्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तुमची इलेक्ट्रिक कार पावसाळ्यातही सुरक्षित ठेवायची असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.