5G Launch : तुम्हाला 5G साठी मोजावे लागणार एवढे पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5G Launch

5G Launch : तुम्हाला 5G साठी मोजावे लागणार एवढे पैसे

5G Launch : पंतप्रधान मोदींनी शनिवारी पहिल्यांदा 5G चा वापर करून एक नवा इतिहास रचला आहे. 5G चा देशात पहिल्यांदाच यशस्वीरीत्या वापर करण्यात आला आहे. यानिमित्त जाणून घेऊया

हेही वाचा: तीन तासांचा movie ३ सेकंदात डाऊनलोड; 5G चे फायदे काय?

5G आल्याने काय फरक पडेल?

  • 4G च्या तुलनेत 5G यूजरला तांत्रिक सुविधा मिळतील.

  • 4G मध्ये इंटरनेट डाऊनलोड स्पीड १५० मेगाबाइट्स प्रति सेकंद पर्यंत सिमीत आहे.

  • तोच स्पीड 5G मध्ये १० जीबी प्रती सेकंदपर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे मोठ्यात मोठी फाईल काही सेकंदातच डाऊनलोड होईल.

  • 5G मध्ये अपलोड स्पीडपण एक जीबी प्रती सेकंद पर्यंत होईल. हेच 4G मध्ये ५० एमबीपीएस पर्यंतच होते.

  • 4G च्या तुलनेत 5G चा एरिया जास्त असल्याने जास्त डिव्हाइसशी जोडले जाऊनही स्पीड कमी होणार नाही.

हेही वाचा: 5G In India : आजच्या तारखेची इतिहासात नोंद, भारतानं आज नवा इतिहास घडवला - नरेंद्र मोदी

यामुळे डेटा प्लॅन महाग होईल का?

ज्या देशांत 5G लाँच झाले आहे, त्यांच्याशी तुलना केली तर अमेरिकेत 4G अनलिमिटेड सेवांसाठी ६८ डॉलर्स (सुमारे ५ हजार रूपये) खर्चावे लागत होते. तिथे 5G साठी ८९ डॉलर्स म्हणजे (सुमारे ६५०० रूपये) मोजावे लागत आहे. वेगवेगळ्या प्लॅन्ससाठी हे बदलत जाते. एकूणच 4G च्या तुलनेत 5G प्लॅनमध्ये १० ते ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे.

हेही वाचा: 5G in India: आता वाढणार इंटरनेटचा वेग, आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु

भारतात हा फरक कमी असण्याची आशा आहे. कारण मागच्या वर्षी जगात भारतात डेट्याची किंमत सगळ्यात कमी होता. एअरटेलचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) रणदीप सेखोन म्हणाले होते की, 5G ची किंमत 4G च्या आसपासच राहणार आहे.