5G लाँचची तयारी करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कंपन्यांना निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5G

5G लाँचची तयारी करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कंपन्यांना निर्देश

ऑगस्टच्या सुरुवातीला 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला, त्यानंतर Airtel, Jio आणि Vodafone Idea देशात 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. आता माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 5G स्पेक्ट्रमचे असाइनमेंट लेटर जारी केलेल्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडे (TSP) सुपूर्द केले गेले आहे आणि कंपन्यांना 5G लॉन्चच्या तयारीला अंतिम रूप देण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे, एअरटेलने स्पेक्ट्रम थकबाकीसाठी 8312.4 कोटी रुपये दिले आहेत. स्पेक्ट्रमचे वाटप पत्र देखील पेमेंट केल्यानंतर काही तासांत एअरटेलला देण्यात आले. खुद्द भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, भारताचे "तंत्रज्ञान" येथे आहे कारण सरकार 5G, सेमीकंडक्टर निर्माण आणि ऑप्टिकल फायबर केबल्स सारख्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. या तंत्रज्ञानामुळे तळागाळात क्रांती होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

हेही वाचा: सावध! 5G SIMच्या नावावर येताय फेक कॉल ? होऊ शकतो स्कॅम

रिलायन्स जिओने 5G लाँच करून आझादीचा अमृत महोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत 15 ऑगस्ट रोजी जिओचे 5G लॉन्च होईल अशी अपेक्षा होती. एअरटेलने देखील असेच विधान केले आहे, परंतु अद्याप कोणत्याही कंपनीचे 5G लाँच केलेले नाही.

Jio ने दावा केला आहे की, ते लवकरच देशातील 1,000 शहरांमध्ये 5G कव्हरेज पूर्ण करेल. Jio कडे अनेक बँडसह 5G चे सर्वाधिक बँड आहेत.

हेही वाचा: 5G network : एका मिनिटात डाऊनलोड होईल 1GB फाईल; तळघरात मिळेल पूर्ण नेटवर्क

5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने 58.65 टक्के म्हणजेच 88,078 कोटी रुपयांची बोली लावली होती.

4G पेक्षा 5G वेगळे कसे?

5G अर्थात फिफ्थ जनरेशन ही सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी आहे जी 4G पेक्षा 100 पट वेगवान आहे. यामुळे लोकांसह व्यवसायांसाठी संधी निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. नेटवर्क क्षमतेत वाढ महत्त्वाची आहे कारण डेटा ट्रॅफिक दरवर्षी सुमारे 60 टक्क्यांनी वाढत आहे.

एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटच्या ठिकाणी 4G नेटवर्कला एकावेळी अनेक उपकरणे (Devices) हाताळताना काही समस्यांना तोंड द्यावे लागले, जी समस्या 5G मध्ये येणार नाही कारण 5G अंतर्गत एकाच वेळी 10 लाख उपकरणे (Devices) हाताळण्यास सक्षम आहे.

5G नेटवर्क केवळ स्मार्टफोनच नाही तर इतर विविध प्रकारच्या उपकरणांनाही जोडण्यासाठी डिझाइन केले आहे. शिवाय 5G कनेक्‍शन नेटवर्क हे -AR-फिल्टर किंवा गेम सारख्या क्लिष्ट प्रोसेसिंग हाताळण्यास सक्षम आहे जे फोनचा परफॉर्मंस आणि बॅटरीवर परिणाम करतात. यात फोन स्लो झाला यासारख्या समस्या येणार नाहीत.

नेटवर्क स्लाइसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून 5G नेटवर्क एकाच वेळी अनेक वेगळे नेटवर्क म्हणून काम करु शकते. म्हणजे नेटवर्कचा एक भाग एका विशिष्ट हेतूसाठी डिझाइन केला जाऊ शकतो आणि स्वतंत्र नेटवर्क म्हणून काम करू शकतो.