esakal | 'टाटा'ची डार्क रेंज बाजारात दाखल; कारची बुकिंगही झाली सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

'टाटा'ची डार्क रेंज बाजारात दाखल; कारची बुकिंगही झाली सुरू

'टाटा'ची डार्क रेंज बाजारात दाखल; कारची बुकिंगही झाली सुरू

sakal_logo
By
प्रणीत पवार

मुंबई : टाटा मोटर्सने अलिकडेच डार्क रेंजच्या (#Dark range) लाँचिंगची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ, भारतातील पहिली ‘जीएनसीएपी’ फाईव्ह स्टार रेटेड कार नेक्झॉन, प्रीमियम एसयूव्ही हॅरियर आणि नेक्झॉन ईव्ही यांचा समावेश आहे.अल्ट्रोझची डिझाइन व शैली हा नेहमीच कौतुकाचा विषय राहिला आहे. अल्ट्रोझ डार्क या नवीन ‘टॉप ऑफ द लाइन’ प्रकारामध्ये एक्स्टिरिअर बॉडी कलर नवीन कॉस्मो ब्लॅक आहे. आर-१६ अलॉय चाकांना डार्क टिंट फिनिशिंग देण्यात आली आहे. हूडवर प्रीमियम डार्क क्रोम वापरण्यात आला आहे. अंतर्गत रचनेसाठी ग्रॅनाईट ब्लॅक थीम वापरण्यात आली आहे. अल्ट्रोझ डार्क टॉप व्हरीएंट एक्सझेड प्‍लस पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे. (a-look-at-dark-editions-of-tata-altroz-nexon-nexon-ev-and-harrier)

डार्क अवतारातील नेक्झॉनची बाह्यरचना नवीन चारकोल ब्लॅक अलॉईज, डार्क मॅस्कॉट, बॉडीवरील सोनिक सिल्व्हर हायलाईट्स आणि मॅट ग्रेनाईट ब्लॅक आच्छादने यांनी सजलेली आहे. अंतर्गत भागात खास गडद अंतर्गत रचना आहे. यामध्ये दर्जेदार लेदरेट अपहोल्स्ट्री आहे. नवीन नेक्झॉन डार्क एक्सझेड प्लस, एक्सझेडए प्लस, एक्सझेड प्लस (ओ) आणि एक्सझेडए प्लस (ओ) व्हेरीएंट्समध्ये पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधन पर्यायांत उपलब्ध आहे.

नेक्झॉन ईव्ही डार्क थीम एक्सझेड प्लस आणि एक्सझेड प्लस एलयूएक्स व्हेरीएंट्समध्ये उपलब्ध आहे. या कारचा बाहेरील भाग मिडनाईट ब्लॅक रंगात आहे. अलॉय व्हिल पूर्णपणे नवीन चारकोल ग्रे रंगात आहेत. कारच्या अंतर्गत भागाची शोभा वाढवण्यासाठी डार्क थीममध्ये पियानो ब्लॅक मिड-पॅड आणि गडद रंगाचा वापर करण्यात आला आहे. आसने व डोअर ट्रिम्सवर ट्राय-अॅरो छिद्रे आहेत. या कारमध्ये टीपीएमएसही (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) दिले जाणार आहे. शिवाय, नेक्झॉन ईव्ही एक्सझेड प्लस प्रकारात मागील आसनांवरील मध्यवर्ती आर्मरेस्टवर कप-होल्डर्स आहेत. ६०:४० रिअर सिट-स्पिल्ट आणि अॅडजस्ट करता येण्याजोगे सीट देण्यात आले आहे.

हॅरियर डार्कमध्ये पूर्णपणे नवीन ओबेरॉन ब्लॅक रंगाला गडद निळ्या छटेची जोड दिल्यामुळे खूपच देखणी झाली आहे. हॅरियरचे १८ इंची ब्लॅक स्टोन ॲलॉय व्हिल या गाडीला आणखीन दणकट लूक देतात. हॅरियरच्या अंतर्गत भागात दर्जेदार डार्क थीम वापरण्यात आली आहे. ही कार एक्सटी प्लस, एक्सझेड प्लस आणि एक्सझेडए प्लस या ३ व्हेरिेएंटमध्ये उपलब्ध आहे.

डार्क थीम कारची बुकिंग सुरू

टाटाच्या डार्क थीम कार विविध शोरुम्समध्ये उपलब्ध असून, त्यांची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना अनन्यसाधारण अनुभव देण्यासाठी टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत डीलरशिप्सची डार्क थीममध्ये खास सजावटही केली आहे. कंपनीने खास डार्क ब्रॅण्डेड लेदर जॅकेट्स व टीशर्टसह संपूर्ण सुरक्षितता ध्यानात ठेवून कंपनीने टायर पंक्चर दुरुस्तीचे किट ग्राहकांसाठी विक्रीसाठी ठेवले आहे.

"सुरुवातीला लिमिटेड एडिशन उत्पादन म्हणून बाजारात आणलेल्या हॅरियर डार्क थीमची कामगिरी उत्तम होती. लोकप्रियतेनुसार ग्राहकांची या कारला मागणीही वाढत होती. आताची विस्तारित डार्क रेंज ही तेवढीच आकर्षक आहे. ही थीम सणासुदीच्या काळात दणकट व शैलीदार गाड्यांच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करेल असा विश्वास आहे", असं टाटा मोटर्स प्रावसी वाहन विभागाचे मार्किटिंग प्रमुख विवेक श्रीवात्स यांनी सांगितलं.

loading image