esakal | दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय; 5G तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रमच्या ट्रायलला दिली परवानगी

बोलून बातमी शोधा

5G Technology

दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय; 5G तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रमच्या ट्रायलला दिली परवानगी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली: भारतात आता लवकरच 5G पर्व सुरु होण्याची शक्यता आहे, कारण त्या दृष्टीने केंद्र सरकारनं आज महत्वाचं पाऊल टाकलं आहे. दूरसंचार विभागानं (Telecommunication Department) 5G तंत्रज्ञान (5G Technology) आणि स्पेक्ट्रमच्या (Spectrum) ट्रायलला (Trial) परवानगी दिली आहे. (a major decision of DoT Permission for trial of 5G technology and spectrum)

दूरसंचार मंत्रालयानं मंगळवारी सांगितलं की, "मोबाईल सेवा देणारे ऑपरेटर्स भारतातल्या विविध ठिकाणी 5Gची ट्रायल सुरु करतील. या ट्रायल्स ग्रामीण भागात, निमशहरी भागात आणि मोठ्या शहरांमध्ये केल्या जाणार आहेत.

भारती एअरटेल लिमिटेड, रिलायन्स जिओइन्फोकॉम लिमिटेड, व्होडाफोन आयडीया लिमिटेड आणि एमटीएनएल या कंपन्यांनी ट्रायलसाठी दूरसंचार विभागाकडे अर्ज केले होते. या सर्व कंपन्यांना सरकारने ट्रायलची परवानगी दिली आहे. या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी 5G तंत्रज्ञानाच्या मूळ उपकरणांचे उत्पादक आणि तंत्रज्ञान पुरवठादार एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉट सोबत करार केला आहे.