
AC Tips: देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. थंडावा मिळावा यासाठी लोक एअर कंडिशनर म्हणजेच एसी वापरतात. एसीचा दीर्घकाळ वापर केल्याने त्याची कार्यक्षमतेवर परिणाम होतो. एसी वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
एसी वापरणाऱ्यांपैकी अनेकांना वाटते की जर त्यांनी एसी कमी तापमानात चालवला तर एसी अधिक थंडावा देईल आणि खोली लवकर थंड होईल. पण असे अजिबात नाही, कमी तापमानात एसी चालवल्याने एसीला जास्त काम करावे लागते आणि विजेचा वापरही वाढतो. एसी 24 ते 26 अंशांवर सेट करावा. असे केल्याने एसी चांगले कूलिंग देते. एसीचे तापमान दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार सेट करता येते, याला प्रोग्रॅमिंग फीचर म्हणतात, पण फार कमी लोक त्याचा वापर करतात.
एसी कुठे आणि कोणत्या आकाराचा घ्यावा या माहितीचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही जर नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल तर रूमनुसार एसी खरेदी करावा. योग्य आकाराचा एसी खरेदी केल्यास वीज बिलात कपात होऊ शकते. यासाठी तुम्ही तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. याशिवाय एसी लावताना त्यातून गळती किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज येत असेल तर लक्ष द्यावे. नेहमी प्रोफेशन मेकॅनिकलकडून एसी लावावा.
अनेक लोक एसी वापरताना नीट काळजी घेत नाहीत. एसीचे एअर फिल्टर वेळोवेळी बदलणे आणि ते स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. एअर फिल्टर दर तीन महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे. असे केल्याने एसीची कार्यक्षमता चांगली राहते. एसीची वेळोवेळी दुरूस्त केल्यास छोट्या मोठ्या समस्या लगेच कमी होतात.
अनेकवेळा एसीच्या हवेचा प्रवाह योग्य नसतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की काही फर्निचरच्या मागून एसी येणे किंवा पडद्यांमुळे हवा नीट फिरत नाही. यामुळे एसी व्हेंट्स नीट काम करत नाहीत. अशावेळी एसीमधून येणारी हवा संपूर्ण खोलीत व्यवस्थित पसरत नाही. अनेकजण एसीसोबत पंखा वापरत नाहीत. ही एक चुकीची सवय आहे. पंखा चालू असल्यामुळे एसीची हवा लवकर आणि व्यवस्थित खोलीत पसरते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.