Mrunal Thakur New Car : मृणालनं विकत घेतली 2 कोटींची लक्झरी कार, फिचरही क्लास, एकदा बघाच

मृणालच्या शानदार आणि पावरफुल लक्झरी सेडान कारची किंमत २ कोटी आहे. चला तर या कारचे जबदरदस्त फिचर जाणून घेऊया
Mrunal Thakur New Car
Mrunal Thakur New Caresakal

Mrunal Thakur New Car : बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांतून अॅक्टींगचा जलवा दाखवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतीच नवी लक्झरी कार विकत घेतलीय. मुंबईच्या एअरपोर्टवर मृणाल ठकूर तिच्या नव्या मर्सिडीज बेंज एस-क्लास 450सह झळकली. त्यानंतर तिच्या कारची चर्चा सोशल मीडियावर बघायला मिळतेय. मृणालच्या शानदार आणि पावरफुल लक्झरी सेडान कारची किंमत २ कोटी आहे. चला तर या कारचे जबदरदस्त फिचर जाणून घेऊया.

एस-क्लास मर्सिडीज-बेंझची फ्लॅगशिप सेडान आहे, जी तिच्या प्रीमियम लुक आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. S - 350d हा Mercedes Benz S-Class चा बेस व्हेरिएंट आहे, जो 2925 cc, 6 सिलेंडर टर्बो-चार्ज्ड डिझेल इंजिनद्वारे अॅस्पिरेटेड आहे. हा व्हेरिएंट 281 Bhp पॉवर आणि 600 Nm पीक टॉर्क जनरेट करतो.

Mercedes Benz S Class 400D मध्ये 3 लीटर टर्बो चार्ज्ड डिझेल इंजिन आहे, जे 325 Bhp पावर आणि 700 Nm पिक टॉर्क जनरेट करते. मर्सिडीजच्या या व्हेरिएंटला ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह लाँच करण्यात आलंय. यात 4MATIC सिस्टिमही आहे.

Mrunal Thakur New Car
Mrunal Thakur: जेव्हा 'गुमराह'च्या रिमेकवर एका ट्विटर युजरने उडवली खिल्ली, मृणाल ठाकूरने दिलं हे गोंडस उत्तर

कंपनीने Mercedes Benz S Class 450D सात पेट्रोल इंजिन ऑप्शनसह लाँच केली आहे. या लक्झरी सेडानमध्ये 3.0 लीटर 6 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 362 bhp पॉवर आणि 500 ​​Nm पिकअप टॉर्क जनरेट करते. (Luxury Cars)

Mrunal Thakur New Car
Mercedes Benz : संतोष अय्यर होणार मर्सिडीज बेंझ इंडियाचे नवे CEO

मृणालकडे टोयोटा फॉर्च्युनरही आहे

मर्सिडीज बेंझ एस क्लास लक्झरी सेडान व्यतिरिक्त, मृणाल ठाकूरकडे Honda Accord आणि Toyota Fortuner सारख्या कार आहेत. मृणाल अलीकडेच आदित्य रॉय कपूरच्या गुमराहमध्ये दिसली होती आणि तिचे पुढील चित्रपट 'पिप्पा', 'पूजा मेरी जान' आणि 'आंख' मिचोली लाइनअपमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com