Aditya L1 : 'आदित्य एल-1'च्या वैज्ञानिकांसाठी लागू होता विचित्र नियम; परफ्यूम वापरण्यावर होती बंदी! जाणून घ्या कारण

ISRO Sun Mission : आदित्य उपग्रहामध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सात पेलोड असणार आहेत.
Aditya L1 ISRO
Aditya L1 ISROeSakal

'आदित्य एल-1'चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरातून कौतुक होत आहे. भारताची ही पहिलीच सौर मोहीम आहे आणि याची अगदी दमदार सुरुवात झाली आहे. यासाठी गेली कित्येक वर्षं शेकडो वैज्ञानिकांनी अथक मेहनत घेतली आहे. या दरम्यान त्यांना काही विचित्र नियमही पाळावे लागले.

आदित्य उपग्रहामध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सात पेलोड असणार आहेत. यातील व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ (VELC) हे मुख्य उपकरण असणार आहे. याची निर्मिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने केली आहे. हे उपकरण बनवणाऱ्या पथकातील सर्व वैज्ञानिकांना परफ्यूम वापरण्यास मनाई करण्यात आली होती. या पथकाचे प्रमुख नागभूषण एस. यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.

Aditya L1 ISRO
Nigar Shaji : शेतकऱ्याची लेक सांभाळतेय 'आदित्य एल-1' ची कमान; इस्रोच्या महिला वैज्ञानिकाची जगभरात चर्चा!

काय आहे कारण?

VELC हे उपकरण तयार करताना यामध्ये कम्पोनन्ट लेव्हल व्हायब्रेशन हा महत्त्वाचा टप्पा होता. यामध्ये डिटेक्टर आणि ऑप्टिकल घटकांना एकत्रित करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. हे इंटिग्रेशन पार पडल्यानंतर अगदी अलगदपणे त्याचं कॅलिब्रेशन करण्यात आलं. या सर्व प्रक्रियेदरम्यान एखादा सूक्ष्म कण जरी या मशीनमध्ये गेला असता; तर वैज्ञानिकांची कित्येक दिवसांची मेहनत वाया गेली असती.

यासाठीच हे उपकरण तयार करताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं होतं. एका क्लीन-रुममध्ये हे उपकरण असेम्बल करण्यात आलं. एखाद्या दवाखान्यात असणाऱ्या ICU पेक्षा एक लाख पटींनी स्वच्छ अशी ही रूम होती. तसंच, यावर काम करणारे सर्व वैज्ञानिक बॉम्ब स्कॉड घालतात त्याप्रमाणे सुरक्षा कवच असणारे सूट घालून होते. हे अर्थातच, त्यांच्या नव्हे तर उपकरणाच्या सुरक्षेसाठी होतं.

Aditya L1 ISRO
Aditya L1 Update : 'आदित्य एल-1' पोहोचलं पृथ्वीच्या वरच्या कक्षेत; इस्रोने दिली मोठी अपडेट!

यामुळेच वैज्ञानिकांना कोणत्याही प्रकारचा परफ्यूम, डिओ वा सेंट वापरण्यास मनाई करण्यात आली होती. कारण, या गोष्टींचे कणही VELC उपकरणासाठी घातक ठरले असते. एवढंच नव्हे, तर या उपकरणात वापरण्यात आलेले स्क्रू देखील अल्ट्रासॉनिक पद्धतीने स्वच्छ करण्यात आले होते. यादरम्यान शास्त्रज्ञांनी सहा तासांच्या शिफ्टमध्ये काम केलं.

दरम्यान; शनिवारी (2 सप्टेंबर) आदित्य उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश मिळालं. यानंतर सुमारे चार महिने प्रवास करून हा उपग्रह L1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचेल. या ठिकाणाहून पुढील पाच वर्षांपर्यंत तो सूर्याचा अभ्यास करणार आहे.

Aditya L1 ISRO
Aditya L1 Launch : 'भारत माता की जय...', आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लोकांचा जल्लोष; व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com