
Hero ची आणखी एक परवडणारी बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स
हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने भारतीय बाजारात सुपर स्प्लेंडर ब्लॅक आणि एक्सेंट (Super Splendor Black and Accent)ही बाईक लाँच केली असून ज्याची किंमत रु.77,430 रुपयांपासून सुरु होते. हिरोच्या या 125cc कम्युटर मोटरसायकलचे नवीन व्हेरिएंट ड्रम आणि डिस्कमध्ये उपलब्ध असणार आहे. ही मोटरसायकल तुम्ही Hero MotoCorp eShop वर ऑनलाईन बुक करू शकाल. या मोटरसायकलच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 77430 रुपये आणि डिस्क व्हेरिएंटची किंमत 81330 रुपये आहे.
फीचर्स काय आहेत?
नवीन सुपर स्प्लेंडर ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरिएटच्या इंधन टाकीवर क्रोम 'सुपर स्प्लेंडर' बॅजसह ऑल-ब्लॅक पेंट देण्यात आला आहे. तसेच हेडलाइटजवळ आणि एक्झॉस्ट हीट शील्डवर क्रोम एलीमेंट दिले आहेत.
त्याची रचना स्टँडर्ड सुपर स्प्लेंडर सारखेच आहे. त्याच्या ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरिएंटमध्ये सिंगल-पॉड हेडलाइट, टिंटेड व्हिझर, सिंगल-पीस सीट, अलॉय-व्हील आणि साइड-स्लंग एक्झॉस्ट पॅक मिळतात.
हेही वाचा: Bike offer : १० हजार भरा आणि खरेदी करा ही जबरदस्त बाइक
इंजिन
नवीन सुपर स्प्लेंडर ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरियंटमध्ये BS6 अनुरूप 124.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे जे 7,500rpm वर 10.7bhp आणि 6,000rpm वर 10.6Nm पीक टॉर्क जनरेट करते.
याशिवाय, यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, फाइव्ह-स्टेप अॅडजस्टेबल रिअर स्प्रिंग आणि दोन्ही चाकांवर 130 मिमी ड्रम ब्रेक देखील मिळतात. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सेफ्टी नेटमध्ये एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.
हेही वाचा: Flipkart-Amazon offer : ४० टक्के सवलतीसह लॅपटॉप खरेदी करण्याची संधी
Web Title: Affordable Hero Super Splendor Black And Accent Launched Check Price And Features Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..