Cyber Security : एआय अ‍ॅप्स आणि स्मार्ट होममुळे लहान मुलांना अधिक सायबर धोका; रिपोर्टमध्ये बाब उघड

एआय टूल्सचा सर्वाधिक वापर घरातील लहान मुलांकडून केला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच सायबर गुन्हेगार त्यांच्याकडून बरीच माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
Cyber Security Kids
Cyber Security KidseSakal

Cyber Security Kids : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. एआय आधारित अ‍ॅप्सचं प्रमाण हे दररोज वाढत आहे. कित्येक गेम्समध्ये देखील एआयचा वापर होऊ लागला आहे. तसंच, स्मार्ट होम डिव्हाईसेसमध्येही एआयचा वापर होतो. मात्र या सगळ्यामुळे लहान मुलांना सर्वाधिक सायबर धोका असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

सायबर सुरक्षा फर्म असणाऱ्या कास्परस्कीने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की एआय टूल्सचा सर्वाधिक वापर घरातील लहान मुलांकडून केला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच सायबर गुन्हेगार त्यांच्याकडून बरीच माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. (Kaspersky report)

एआय आधारित अ‍ॅप्समध्ये कमांड देणारी व्यक्ती कोण आहे हे ओळखण्यासाठी तरतूद नसते. त्यामुळे संकेत मिळाल्यानंतर एज-रिस्ट्रिक्टेड कंटेंट देखील दाखवण्यात येऊ शकतो. तसंच, गेम्समध्ये लहान मुलांना विविध प्रकारची आमिषं दाखवून त्यांना लिंकवर क्लिक करण्यास सांगण्याचा धोकाही असतो. कित्येक वेळा लहान मुलं आपल्या आई-वडिलांचा फोन वापरून अशा लिंक्सवर क्लिक करतात, यामुळे आर्थिक फसवणूक, डेटा चोरी अशा घटना घडल्याचं यापूर्वीही समोर आलं आहे. (AI fishing)

Cyber Security Kids
Biggest Data Breach : टेलिग्राम, लिंक्डइन, एक्स अशा कित्येक अ‍ॅप्सचा डेटा लीक! 2600 कोटी फाईल्स सायबर गुन्हेगारांच्या हाती

स्मार्ट होम डिव्हाईस

आजकाल कित्येक घरांमध्ये स्मार्ट होम डिव्हाईस पहायला मिळतं. गाणी लावणे, तापमान जाणून घेणे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारणे अशा गोष्टींसाठी याचा वापर होतो. मात्र, हेच डिव्हाईस हॅक झाल्यास ते लहान मुलांना त्यांचं नाव, पत्ता किंवा अन्य संवेदनशील माहिती विचारू शकतात. लहान मुलेही केवळ मजा म्हणून होम डिव्हाईसेसना ही माहिती देऊ शकतात. (Danger of Smart Home Devices)

अशी घ्या खबरदारी

  • सध्याचं जग हे टेक्नॉलॉजीचं आहे. आपल्यापेक्षा लहान मुलं अगदी लीलया नवं तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. त्यामुळे त्यांना लहान वयातच सायबर सुरक्षेचे धडे देणं गरजेचं आहे.

  • पॅरंटिंग अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही मुलांच्या इंटरनेट सवयींवर लक्ष ठेऊ शकता.

  • लहान मुलं मोबाईल वापरत असताना कायम त्यांच्यावर लक्ष ठेवणं शक्य नाही, त्यामुळे मोबाईलमध्ये ठराविक कंटेंटसाठी एज-रिस्ट्रिक्शन फिल्टर लागू करणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com