

AI Hallucination
esakal
Mumbai: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून दिलेली माहिती खरी आहे की खोटी, हे तपासल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, याचे उदाहरण मुंबई उच्च न्यायालयात समोर आले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांचा उल्लेख होता. मात्र, हे निकाल शोधूनही सापडत नसल्याचे एका कंपनीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित आदेश रद्द केला आणि नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.