Electricity Use of AI : 'एआय'मुळे येऊ शकतं मोठं वीज संकट! दर तासाला वापरली जातेय 17 हजार पट अधिक उर्जा

Artificial Intelligence : दि न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ओपनएआय कंपनीचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल 5 लाख किलोवॅट वीज खर्च करतो.
Electricity Use of AI
Electricity Use of AIeSakal

ChatGPT Consuming Energy : एआयमुळे एकीकडे लोकांची बरीच कामं सोपी झाली आहेत. मात्र, हळू-हळू एआयचे कित्येक धोके देखील समोर येत आहेत. एकीकडे एआयमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच; याच एआयमुळे जगावर मोठं वीज संकटही येऊ शकतं असं म्हटलं जातंय. एका रिपोर्टमध्ये याबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

दि न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ओपनएआय कंपनीचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल 5 लाख किलोवॅट वीज खर्च करतो. सध्या जगभरात कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपले आपले एआय चॅटबॉट (AI Chatbot) लाँच केले आहेत. एकट्या चॅटजीपीटीची आकडेवारी एवढी असेल, तर सगळ्यांची मिळून किती वीज खर्च होत असेल, हा विचारच हादरवून टाकणारा आहे. (AI Electricity use)

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते, त्या तुलनेत तब्बल 17,000 पट अधिक वीज चॅटजीपीटी दररोज वापरतं. चॅटजीपीटीच्या केवळ 20 कोटी यूजर्ससाठी हा खर्च होतो. भविष्यात चॅटजीपीटीचा विस्तार झाला, त्याचे यूजर्स वाढले की पर्यायाने त्यासाठी होणारा विजेचा वापरही अधिक होणार आहे. (ChatGPT Electricity Use)

Electricity Use of AI
Elon Musk on Grok : ओपन एआय सारखी नफेखोर नसणार आमची कंपनी; 'ग्रॉक' असणार पूर्णपणे ओपन सोर्स! इलॉन मस्कची मोठी घोषणा

बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत डेटा सायंटिस्ट अ‍ॅलेक्स डी. व्रीज यांनी सांगितलं, की गुगल सध्या प्रत्येक सर्च रिझल्टमध्ये जनरेटिव्ह एआय (Generative AI) वापरत आहे. एआयमुळे वर्षाला सुमारे 29 बिलियन किलोवॅट प्रतितास एवढी वीज वापरली जाते. केनिया, क्रोएशिया अशा छोट्या देशांना संपूर्ण वर्षभरासाठी देखील ही वीज पुरून उरते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एआयचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे, तेवढा त्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापरही वाढणार आहे. एआयचे यूजर्स सध्या तुलनेने अगदीच कमी आहेत. मात्र, भविष्यात जेव्हा सगळ्या क्षेत्रांमध्ये एआय पसरेल आणि यूजर्स वाढतील तेव्हा त्यासाठी होणाऱ्या वीजेचा वापरही भरमसाठ वाढणार आहे. यामुळे आतापासूनच एआय कंपन्यांनी सोलर किंवा अन्य हरित उर्जेचा वापर करावा असं आवाहन कित्येक तज्ज्ञ करत आहेत.

Electricity Use of AI
AI Air Hostess : कतार एअरवेजने सादर केली चक्क एआय-एअर होस्टेस; प्रवाशांच्या प्रश्नांची देते अचूक उत्तरं.. पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com