Oxygen on Mars : आता थेट मंगळ ग्रहावर तयार करता येणार ऑक्सिजन; एआय केमिस्टचं मोठं संशोधन!

AI Robot Chemist : एआय-आधारित रोबोट केमिस्टने मंगळावरील उल्कापिंडाचे विश्लेषण करुन याबाबत रिपोर्ट दिला आहे.
AI Oxygen on Mars
AI Oxygen on MarseSakal

Make Oxygen on Mars : मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करता येतील असे रेणू शोधण्यात चक्क एका एआयला यश मिळालं आहे. यामुळे आता मंगळावर वस्ती करण्याचं मानवाचं स्वप्न साकार होऊ शकतं, असा दावा करण्यात येत आहे. मंगळावरील एका दगडाच्या नमुन्यात हे रेणू आढळले आहेत.

एआय-आधारित रोबोट केमिस्टने मंगळावरील उल्कापिंडाचे विश्लेषण करुन याबाबत रिपोर्ट दिला आहे. स्पेस डॉट कॉम या वेबसाईटने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या शोधामुळे आता मंगळ ग्रहावरच ऑक्सिजनची निर्मिती करता येणार आहे.

भविष्यात मंगळावर वस्ती करण्याचं स्वप्न मानव गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहे. स्पेस एक्स, नासा आणि जगभरातील कित्येक स्पेस एजन्सी यादृष्टीने संशोधन करत आहेत. यातील सर्वात मोठं आव्हान हे मंगळावर ऑक्सिजन नेणे आणि आणणे हे होतं. मात्र, आता या शोधामुळे ही अडचण दूर होणार आहे.

AI Oxygen on Mars
AI CEO Mika : जगातील पहिली एआय-सीईओ समोर; मस्क-झुकरबर्ग यांच्याहूनही सरस काम, सुट्टीही नाही घेत!

असा लावला शोध

वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहावरील पाच प्रकारच्या उल्कापिंडांचे नमुने एका AI Chemist ला दिले होते. या सर्वांचा अभ्यास आणि विश्लेषण करून एक अशा प्रकारचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे, जे सातत्याने ऑक्सिजनची निर्मिती करेल.

"मंगळावरील सामग्रीचा वापर करुन OER उत्प्रेरकाला अभिनव पद्धतीने संश्लेषित (Synthesize) करण्यासाठी एआय केमिस्टची मदत घेण्यात आली." अशी माहिती या संशोधनाचे प्रमुख वैज्ञानिक लुओ यांनी सांगितलं. या शोधामुळे भविष्यात मानव मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची फॅक्टरी देखील उभारू शकतो, असं चीनचे वैज्ञानिक प्रा. जून जियांग यांनी म्हटलं आहे.

AI Oxygen on Mars
AI Pet Language : पाळीव प्राण्यांचे हावभाव पाहून ओळखता येणार त्यांच्या मनातलं; खास 'एआय' टूल करणार मदत

अंतराळ मोहिमांना फायदा

अंतराळवीरांना केवळ श्वास घेण्यासाठीच ऑक्सिजनची गरज असते असं नाही. याव्यतिरिक्त रॉकेट प्रॉपेलंट म्हणून वापरण्यासाठी देखील ऑक्सिजनची गरज भासते. याव्यतिरिक्त पाण्याच्या निर्मितीसाठी देखील ऑक्सिजन गरजेचा आहे. त्यामुळेच या शोधाचा भविष्यातील अंतराळ मोहिमांना देखील फायदा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com