AI मुळे लोकांचे जॉब जाणार नाहीत, पण...; संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमधून दिलासादायक निष्कर्ष

ai
aiesakal

नवी दिल्ली- नोव्हेंबर २०२० मध्ये OpenAI कडून ChatGPT समोर आणण्यात आलं. त्यानंतर कृत्रित बुद्धिमत्तेची (AI) एक प्रकारे क्रांती आली असं म्हटलं जाऊ लागलंय. अनेक कंपन्यांनी आपापले AI टूल आणले आहेत. येत्या काळात AI चा मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याचं स्पष्ट आहे. यामुळे अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालीये, की यामुळे लोकांचे जॉब जातील. पण, संयुक्त राष्ट्राच्या राष्ट्रीय श्रम संघटनेकडून International Labour Organization (ILO) नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

कंपनीतील कर्मचाऱ्यांना पुरक म्हणून AI काम करेल अस काहींना वाटतं, तर काहींना याबाबत शंका आहे. त्यांना वाटतं की, AI मुळे अनेकांचे जॉब धोक्यात आले आहेत. इलोन मस्क यांना देखील लोकांचे जॉब AI घेऊन टाकेल असंच वाटतं. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होईल, याबाबत सर्वांनाच जाणून घ्यायचंय. राष्ट्रीय श्रम संघटनेकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून या गोष्टींवरच प्रकाश टाकण्यात आलाय.

ai
AI Partner : नोकरीच नाही, तर छोकरीही नेतंय एआय! पतीला सोडून महिलेचा चॅटबॉट सोबत रोमान्स; म्हणे ही चीटिंग नाही

AI कडून जॉब्सवर अतिक्रमण?

आयएलओच्या अभ्यासानुसार, AI लोकांचे जॉब घेणार नाही, पण लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होईल. एएमपी रिपोर्टनुसार, अनेक कंपन्या काही प्रमाणातच ऑटोमेशनचा स्वीकार करतील. कंपन्या पूर्णपणे AI चा स्वीकार करणार नाहीत, पण कामाची गुणवत्ता वाढण्यासाठी याचा वापर करतील.त्यामुळे AI च्या आगमनाचा सर्वात मोठा परिणाम लोकांचे जॉब जातील असा नसून लोकांच्या कामाच्या पद्धतीत बदल होईल हा आहे.

ai
3D-Printed Post Office: 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानावर आधारित पहिल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन; जाणून घ्या काय आहे तंत्रज्ञान

AI च्या प्रवेशाने नक्कीच कामाची गुणवत्ता, प्रभाव नक्कीच वाढेल. तसेच AI चा परिणाम व्यायसायिक क्षेत्रानुसार आणि प्रदेशानुसार बदलत जाईल. विशेष म्हणजे AI चे आगमन पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त प्रभाव टाकेल. पुरुषांपेक्षा महिलांच्या जॉब्सच्या संधींमध्ये कमतरता येण्याची जास्त शक्यता आहे.

ai
Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3'च्या लँडिंगसाठी 'एआय'ने केली मदत; विक्रम लँडरने स्वतःच पार पाडली प्रक्रिया

OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन

OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी एका मुलाखतीदरम्यान दावा केला होता की, AI मुळे नक्कीच लोकांचे जॉब धोक्यात आहेत. AI चा परिणाम लोकांच्या जीवनावर नकारात्मक होऊ शकतो. अनेकांना वाटतं की AI मुळे सगळं चांगलंच होईल, पण तसं काही नाही. अल्टमन म्हणाले की, OpenAI ने आणखी एक तंत्रज्ञान बनवलं आहे. ते मी जाहीर केलं तर सगळ्यांना धक्काच बसेल. पण, लोक याला अजून तयार नाहीत. त्यामुळे येत्या पाच वर्षात हे तंत्रज्ञान समोर आणलं जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com