esakal | Airtel चा ब्रॉडबँड प्लॅन, 1 हजार रुपयात मिळेल 200Mbps स्पीडने डेटा

बोलून बातमी शोधा

Airtel
Airtel चा ब्रॉडबँड प्लॅन, 1 हजार रुपयात मिळेल 200Mbps स्पीडने डेटा
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

देशभरातील बहुतेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद आहेत. म्हणूनच इंटरनेटचा वापर वाढला आहे. आपण घरी अभ्यास करण्यासाठी किंवा कार्यालयीन काम करण्यासाठी एखादी चांगली ब्रॉडबँड योजना शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. आज आपण एअरटेलच्या सर्वोत्कृष्ट ब्रॉडबँड प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

Airtel ब्रॉडबँड प्लॅन

एअरटेलच्या या ब्रॉडबँड प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये आपल्याला 200 एमबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळेल. तसेच आपण अमर्यादित कॉलिंग करु शकाल. याशिवाय ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि एअरटेल एक्सट्रीमचा एक्सेस देखील मिळेल.

एअरटेल आणि जिओला मोठा धक्का

केंद्र सरकारने काही काळापूर्वी 5 जी नेटवर्कविषयी मोठी घोषणा केली होती. सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा देशात 5 जी रोलआउट होणे शक्य नाही. याची सुरुवात 2022 पर्यंत भारतात होऊ शकते. संसदीय समितीच्या अहवालानुसार पुढील सहा महिन्यांनंतर आणखी एक स्पेक्ट्रम लिलाव होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत 5 जी भारतात आणली जाईल.

संसदीय समितीच्या अहवालामुळे रिलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांच्या योजनांना धक्का बसू शकचो. यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की जिओ वर्ष 2021 च्या उत्तरार्धात भारतात 5 जी सेवा सुरू करेल. अंबानींच्या निवेदनानुसार जिओ 5 जी सेवेमध्ये आघाडीवर असेल. त्याचबरोबर, एअरटेलकडून हैदराबादमधे व्यावसायिक नेटवर्कवर यंदा 5 जी सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्या एअरटेल आणि जिओने 5 जी साठी तयारी पूर्ण केली आहे. या दोन्ही कंपन्या केवळ सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.