OTT साठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, 'या' प्लॅन्समध्ये फ्री मिळेल सबस्क्रिप्शन | Recharge Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OTT

Recharge Plans: OTT साठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, 'या' प्लॅन्समध्ये फ्री मिळेल सबस्क्रिप्शन

Airtel Best Postpaid Plans: टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या पोर्टफोलियोमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. कंपनीच्या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल सांगायचे तर यात तुम्हाला काही खास ऑफर्सचा फायदा मिळेल. कंपनीचे प्लॅन्स Amazon Prime आणि Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येतात.

एअरटेलच्या या प्लॅन्सची सुरुवाती किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते. मात्र, तुम्ही थोडे अतिरिक्त पैसे खर्च केल्यास ओटीटी बेनिफिट्स मोफत मिळतील. कंपनीच्या या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Poco Phone: अवघ्या ७ हजारात लाँच झाला पोकोचा शानदार स्मार्टफोन, फीचर्स खूपच अफलातून

Airtel चा ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ४० जीबी डेटा मिळेल. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, डेटा रोलओव्हरचा देखील फायदा दिला जातो.

या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणतेही ओटीटी बेनिफिट्स मिळणार नाहीत. मात्र, तुम्ही फक्त १०० रुपये अतिरिक्त खर्च केल्यास ओटीटी बेनिफिट्सचा फायदा मिळेल.

हेही वाचा: Redmi vs Lava: ७ हजारांच्या बजेटमधील कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? जाणून घ्या फीचर्स-किंमत

Airtel चा ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Airtel च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ओटीटी बेनिफिट्ससोबत अतिरिक्त डेटाचा देखील फायदा मिळेल. प्लॅनमध्ये एकूण ७५ जीबी डेटा दिला जातो. सोबतच, देशातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते.

प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात ६ महिन्यासाठी Amazon Prime मेंबरशिप आणि १ वर्षासाठी Disney+ Hotstar mobile चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, हँडसेट प्रोटेक्शन आणि Wynk Premium चा देखील बेनिफिट मिळेल.

तुम्ही जर संपूर्ण कुटुंसाठी येणारा प्लॅन शोधत असाल तर ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन फायद्याचा ठरेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग, एसएमएससह अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळेल.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट