कोरोना काळात सायबर हल्ल्यांमध्ये वाढ; Airtel सीईओंनी दिला महत्त्वपूर्ण इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर हल्ल्यांमध्ये वाढ; Airtelने दिला महत्त्वपूर्ण इशारा

सायबर हल्ल्यांमध्ये वाढ; Airtelने दिला महत्त्वपूर्ण इशारा

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे सध्याच्या काळात प्रत्येक जण ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देत आहे. परंतु, हे ऑनलाइन व्यवहार करण्यासोबतच आता अनेक सायबर क्राइमच्या (Cyber Fraud) घटनादेखील घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच एयरटेल (Airtel) कंपनीचे सीईओ गोपाळ विठ्ठल (Gopal Vittal) यांनी ग्राहकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सायबर क्राइमचं प्रमाण रोखण्यासाठी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहे. सोबतच त्यादृष्टीने कंपनीने पावल उचलण्यास सुरुवात केली आहे. (airtel ceo has warning for its 300 plus million subscribers all you need to know)

ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या एका ई-मेलचा संदर्भ देत विठ्ठल यांनी fraudster करत असलेली फसवणूक व डिजिटल पेमेंट करतांना होणारी फसवणूक याकडे ग्राहकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. म्हणून या काळात ऑनलाइन व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. परंतु, या व्यवहारांसोबतच सायबर क्राइमच्या घटनांमध्येही वाढ होतांना दिसत आहे, असं विठ्ठल म्हणाले.

हेही वाचा: International Tea Day : चहाचा शोध कसा लागला माहित आहे का?

सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांसाठी Airtelचं नवीन फिचर

ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी Airtelकडून इंडस्ट्री फर्स्ट फीचर सुरु करण्यात आलं आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांचे सर्व आर्थिक किंवा ऑनलाइन व्यवहार सुरक्षितरित्या करता येतील.

कृपया एक गोष्ट ध्यानात घ्या, Airtel कंपनी कोणत्याही व्हिआयपी क्रमांकाची फोनवर विक्री करत नाही. तसंच आम्ही कधीही अन्य दुसऱ्या कंपनीचं कोणतंही अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला देत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर १२१ या क्रमांकावर फोन करुन खात्री करुन घ्या, असंही विठ्ठल म्हणाले.

फसवणुकीपासून रहा दूर

काही जण Airtel चा कर्मचारी असल्याचं सांगून ग्राहकांना फोन करत आहेत व त्यांच्याकडून केवायसीच्या नावाखाली संपूर्ण वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत. तसंच ‘एयरटेल क्विक सपोर्ट’ हे अॅपदेखील डाउनलोड करण्यास सांगत आहे. विशेष म्हणजे या नावाचं कोणतंही अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. हे अॅप गुगलच्या माध्यमातून डाउनलोड केल्यास तुमची संपूर्ण माहिती समोरच्या माणसाकडे ओपन होते ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

loading image
go to top