Netflix Free : प्रीपेड रिचार्जवर 'नेटफ्लिक्स' मिळणार फ्री! कोणत्या कंपनीची आहे ही भन्नाट ऑफर?

Netflix Subscription : भारतात नेटफ्लिक्सच्या या सबस्क्रिप्शनची किंमत 199 रुपये प्रति महिना आहे.
Netflix Free Offer
Netflix Free OffereSakal

कोरोना काळानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात देखील नेटफ्लिक्स, डिज्नी+हॉटस्टार, अमेझॉन प्राईम अशा प्लॅटफॉर्म्सचे अनेक सबस्क्राईबर्स आहेत. यातील नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन हे सगळ्यात महागडं आहे. त्यातच कंपनीने पासवर्ड शेअरिंगवर देखील निर्बंध लागू केले आहेत. मात्र, आता नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मोफत मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

एअरटेल कंपनी आपल्या एका रिचार्ज प्लॅनवर चक्क नेटफ्लिक्सचं बेसिक सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. भारतात नेटफ्लिक्सच्या या सबस्क्रिप्शनची किंमत 199 रुपये प्रति महिना आहे. याबाबत कंपनीने घोषणा केली नसली, तरी कंपनीच्या वेबसाईटवर या प्लॅनची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

Netflix Free Offer
Netflix: नेटफ्लिक्सची खेळी! पासवर्ड शेअरिंगवर बंधने असतानाही सब्सक्रिप्शनमध्ये झाली एवढ्या टक्क्यांची वाढ

किती रुपयांचा आहे प्लॅन?

एअरटेलच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनवर ही ऑफर लागू करण्यात आली आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 3GB हायस्पीड 5G इंटरनेट, दररोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन अशा सुविधा मिलणार आहेत.

जिओचाही सारखाच प्लॅन

एअरटेलने अशा प्रकारचा प्लॅन लाँच करण्याची ही पहिलीच वेळ असली, तरी जिओचा आधीपासूनच असा प्लॅन उपलब्ध आहे. जिओच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्येही सारखेच फीचर्स मिळतात. सोबतच जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा अ‍ॅक्सेस मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com