'एअरटेल'चा नवा 'इंटरनेट टीव्ही'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नवी दिल्ली - "सेट टॉप बॉक्‍स'द्वारे टीव्ही पाहण्याच्या पारंपारिक पद्धतीला नेटफ्लिक्‍स आणि ऍमेझॉन प्राईम व्हिडिओसारख्या नव्या सुविधांमुळे धोका निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर "एअरटेल'ने "इंटरनेट टीव्ही' समोर आणला आहे. या टीव्हीमध्ये पारंपारिक पद्धतीने टीव्ही पाहण्याच्या सुविधेसह सेट टॉप बॉक्‍सद्वारे गेम्स आणि ऍप्सचाही आनंद घेता येणार आहे.

नवी दिल्ली - "सेट टॉप बॉक्‍स'द्वारे टीव्ही पाहण्याच्या पारंपारिक पद्धतीला नव्या सुविधांमुळे धोका निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर "एअरटेल'ने "इंटरनेट टीव्ही' समोर आणला आहे. या टीव्हीमध्ये पारंपारिक पद्धतीने टीव्ही पाहण्याच्या सुविधेसह सेट टॉप बॉक्‍सद्वारे गेम्स आणि ऍप्सचाही आनंद घेता येणार आहे.

एअरटेलच्या हायब्रिड सेट टॉप बॉक्‍सद्वारे "इंटरनेट टीव्ही' वापरता येणार आहे. या सेट टॉप बॉक्‍सला वाय-फाय रिसीव्हर आणि ब्लुटुथ बेस्ड रिमोट कंट्रोलची सुविधा आहे. त्यामुळे त्याद्वारे गुगल व्हॉईस सर्चही करता येणार आहे. रिमोट कंट्रोलला आवाजी सूचना (Voice Search) देऊन तुम्ही टीव्ही पाहू शकता. हा सेट टॉप बॉक्‍स वापरण्यासाठी "फोर जी' स्पीड असलेले इंटरनेट कनेक्‍शन आवश्‍यक आहे. युट्युब, गुगल प्ले, एअरटेल मुव्ही ऍप प्रीलोडेड मिळणार आहेत. सेट टॉप बॉक्‍सला युएसबी पोर्टची सुविधाही उपलब्ध आहे. या सेट टॉप बॉक्‍सला आठ जीबी इंटरनेट स्टोरेज उपलब्ध आहे. सध्या ऍमेझॉनवर हा सेट टॉप बॉक्‍स विक्रीसाठी उपलब्ध असून लवकरच तो ऑफलाईन बाजारातही उपलब्ध होणार आहे.

Web Title: Airtels new internet tv