Amazon Republic Day Sale 2021 : 'या' टॉप स्मार्टफोनवर मिळतायत बेस्ट डील्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon great republic day sale 2021

Amazon Republic Day Sale : 'या' टॉप स्मार्टफोनवर मिळतायत बेस्ट डील्स

amazon great republic day sale 2021 : Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 मध्ये अॅमेझॉन विविध स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. सेल इव्हेंट प्राइम मेंबर्ससाठी आज, 16 जानेवारीपासून सुरू झाला, तर नॉन-प्राइम ग्राहक 17 जानेवारीपासून लाभ घेऊ शकतात. रिपब्लिक डे सेल 2022 20 जानेवारीपर्यंत चालेल, ग्राहक नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर, Amazon कूपन आणि मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकतात.

याशिवाय, SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना निवडक स्मार्टफोन्सवर 1,750 रुपयांपर्यंत इंस्टंट सूट मिळेल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही डिटेल्स पाहू शकता.

iPhone 12 : iPhone 12 स्मार्टफोन, Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 मध्ये बेस 64GB मॉडेलसाठी 53,699 रुपयांपासून खरेदी कराता येणार आहे. तर दुसरीकडे, त्याचे 128GB आणि 256GB मॉडेल अनुक्रमे 61,999 आणि 75,999 रुपयांना उपलब्ध आहेत. फोनमध्ये ड्युअल-रियर कॅमेरे आणि 12-मेगापिक्सेल सेल्फी स्नॅपर दिलेला आहे. तसेच ग्राहकांना 5G सपोर्ट, 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आणि MagSafe वायरलेस चार्जिंग मिळते.

OnePlus 9R : या फोनची किंमत देखील सेलमध्ये कमी झाली आहे, कंपनीने OnePlus 9RT नुकताच भारतात रिलीज केला असून याची किंमत 36,999 रुपये आहे. मात्र अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 मध्ये SBI चे ग्राहक किंमत आणखी कमी करून 33,999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. फोन 65W फास्ट चार्जिंग, क्वाड रिअर कॅमेरे आणि 120Hz रिफ्रेश रेटसह Vivid 6.55 इंच फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह येतो.

हेही वाचा: OnePlus 9RT 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomi 11 Lite NE 5G : ग्राहक Xiaomi 11 Nite NE 5G देखील या सेलमध्ये खरेदी करु शकतात जो स्नॅपड्रॅगन 778 SoC सह येतो यामध्ये तुम्हाला शक्तिशाली मिड-बजेट चिपसेट तसेच चांगली बॅटरी लाइफ मिळते. Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 मध्ये फोनची किरकोळ किंमत 26,999 रुपये आहे. ग्राहक 1,000 रुपये किमतीचे Amazon कूपन वापरून 25,999 रुपयात हा फोन खरेदी करु शकतात. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे, 6.81mm जाड बॉडी आणि 4,250mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy M52 5G: स्नॅपड्रॅगन 778G वर चालणाऱ्या Samsung Galaxy M52 5G च्या किंमतीतही मोठी कपात झाली आहे आणि सध्या Amazon सेल दरम्यान त्याची किंमत 24,999 रुपये आहे. SBI ग्राहक बेस 6GB RAM मॉडेल कमी किंमतीत 21,999 रुपयांना खरेदी करु शकतात. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टिम आणि मोठा 6.7 सॅमोलेड डिस्प्ले दिला आहे.

हेही वाचा: Amazon वर येतोय रिपब्लिक डे सेल; स्मार्टफोन, लॅपटॉपवर मिळेल बंपर सूट

Nokia G20 : जर तुम्ही आणखी कमी बजेट पर्याय शोधत असाल तर, Nokia G20 (4GB RAM + 64GB स्टोरेज) ची किंमत Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 दरम्यान 12,490 रुपये आहे. या फोनमध्ये 48-मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सिस्टम दिली आहे तसेच 5,050mAh बॅटरी आणि 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD+ स्क्रीन देखील मिळते.

Realme Narzo 50A : आणखी एक बजेट फोन Realme Narzo 50A ची किंमत या सेलमध्ये कमी झाली आहे आणि हा फोन ग्राहक 9,449 रुपये (SBI ऑफरसह) खरेदी करु शकतात. यामध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी देखील मिळते.

हेही वाचा: Flipkart चा बंपर सेल! फोन, टीव्हीवर मिळतेय 80% पर्यंत सूट

Web Title: Amazon Great Republic Day Sale 2021 Check These Best Deals On Top Notch Smartphones

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amazon
go to top