Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Amazon Launches AI-Powered Alexa+ in India: 8 वर्षांनंतर ॲलेक्सा बदलला; नवा AI Alexa+ कसा काम करतो? पाहा सर्व अ‍ॅडव्हान्स फीचर्स! अर्ली-ॲक्सेस पूर्णपणे फ्री...
Amazon Launches AI-Powered Alexa+ in India: Hindi & Hinglish Support

Amazon Launches AI-Powered Alexa+ in India: Hindi & Hinglish Support

esakal 

Updated on

Amazon Alexa: जागतिक टेक दिग्गज अमेझॉनने (Amazon) भारतात आपल्या व्हॉईस असिस्टंटची नवीन आणि अत्यंत प्रगत आवृत्ती 'Alexa+' अधिकृतपणे लाँच केली आहे. भारतात ॲलेक्साच्या स्थापनेला ८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने हा मोठा जनरेटिव्ह AI-आधारित अपग्रेड सादर केला आहे. विशेष म्हणजे, भारताबाहेर जागतिक स्तरावर 'Alexa+' सादर करण्याची ही अमेझॉनची पहिलीच वेळ आहे.

सध्या अर्ली-ॲक्सेस टप्प्यादरम्यान ही सेवा भारतातील सर्व युजर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ली-ॲक्सेसचा कालावधी संपल्यानंतरही अमेझॉन प्राईम (Amazon Prime) सदस्यांसाठी 'Alexa+' कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत उपलब्ध राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com