Amazon Prime Lite : अमेझॉनची ख्रिसमस भेट! प्राईम लाईटचं सबस्क्रिप्शन झालं स्वस्त, बेनिफिट्समध्ये झाली वाढ

अमेझॉन भारतातील ग्राहकांना चार प्लॅन्स ऑफर करते. यामध्ये 299 रुपयांचा मासिक प्लॅन, 599 रुपयांचा क्वार्टरली प्लॅन, 1,499 रुपयांचा स्टँडर्ड वार्षिक प्लॅन आणि अमेझॉन लाईट प्लॅन यांचा समावेश होतो.
Amazon Prime Lite
Amazon Prime LiteeSakal

Amazon Prime Lite Subscription Price : अमेझॉनने आपल्या यूजर्सना ख्रिसमसचं मोठं गिफ्ट दिलं आहे. अमेझॉन प्राईम लाईटची सबस्क्रिप्शन फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता या सेवेसाठी वर्षाला 999 ऐवजी 799 रुपये द्यावे लागतील. सोबतच कंपनीने या प्लॅनच्या बेनिफिट्समध्ये देखील बदल केला आहे.

अमेझॉन प्लॅन्स

अमेझॉन भारतातील ग्राहकांना चार प्लॅन्स (Amazon Plans) ऑफर करते. यामध्ये 299 रुपयांचा मासिक प्लॅन, 599 रुपयांचा क्वार्टरली प्लॅन, 1,499 रुपयांचा स्टँडर्ड वार्षिक प्लॅन आणि 999 रुपयांचा अमेझॉन लाईट प्लॅन (Amazon Lite Plan) यांचा समावेश होतो. याच प्लॅनची किंमत आता कमी होऊन 799 रुपये झाली आहे.

कोणते मिळणार बेनिफिट्स?

अमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शनमध्ये यूजर्सना वन-डे-डिलिव्हरी, टू-डे, शेड्यूल डिलिव्हरी तसंच सेम डे डिलिव्हरी असे ऑप्शन्स मिळतात. सोबतच, नो कॉस्ट ईएमआय, अमेझॉन डील्स, सेलसाठी अर्ली अ‍ॅक्सेस असे बेनिफिट्स (Amazon Lite Benefits) मिळतात.

Amazon Prime Lite
Amazon Car Shopping : आता घरबसल्या ऑर्डर करता येणार कार; अमेझॉनवर सुरू होणार विक्री! जाणून घ्या सविस्तर

यासोबतच आता कंपनीने नो-रश शिपिंग, 175 रुपयांहून अधिक किंमतीच्या ऑर्डरसाठी मॉर्निंग डिलिव्हरी, इतर ऑर्डरवर 25 रुपयांपर्यंत कॅशबॅक असे बेनिफिट्स यामध्ये अ‍ॅड केले आहेत. यूजर्सच्या तोट्याची एकच गोष्ट यामध्ये बदलण्यात आली आहे. पूर्वी लाईट प्लॅन हा दोन डिव्हाईसवर वापरता येत होता, आता तो केवळ एका डिव्हाईसमध्ये चालणार आहे.

अमेझॉन प्राईम लाईट प्लॅनमध्ये HD व्हिडिओ पाहता येतात. तसंच अमेझॉन प्राईम म्युझिक आणि अमेझॉन रीडिंग या सुविधा लाईट प्लॅनमध्ये मिळत नाहीत. (Amazon Prime Lite Benefits)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com