Amazon Prime Video Plans : Amazon ने दिला 440W चा झटका, प्राइम व्हिडिओचा प्लॅन 140 रुपयांनी महागला

आता Amazon Prime Video Subscription साठी जास्त पैसे भरावे लागणार आहेत.
Amazon Prime Video Plans
Amazon Prime Video Plansesakal

Amazon Prime Video Plans : तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वरील वेब सीरीज बघायला आवडत असतील तर तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. होय, Amazon ने आपल्या प्राइम व्हिडिओ प्लॅनच्या किंमती वाढवून ग्राहकांना धक्का दिलाय. आता Amazon Prime Video Subscription साठी जास्त पैसे भरावे लागणार आहेत.

प्राइम व्हिडिओचा सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की कंपनी चार प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये मंथली, 3 महिने, इयरली आणि लाइट प्लॅन्स असतात. Amazon ने डिसेंबर 2021 मध्ये प्राइम व्हिडिओच्या किंमती वाढवल्या होत्या.

Amazon Prime Video Plans
Netflix vs Amazon Prime Video : तुम्हालाही Netflix महाग वाटते ? मग एकदा हे वाचाच

Amazon प्राइम मेंबरशिपच्या मंथली प्लॅनची ​​किंमत आधी 179 रुपये होती पण आता किंमत 299 रुपये झाली आहे म्हणजेच हा प्लॅन 120 रुपयांनी महाग झाला आहे.

दुसरीकडे, Amazon Prime Video च्या 3 महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत आधी 459 रुपये होती, पण जर तुम्ही हा प्लान आता खरेदी केला तर हा प्लान तुम्हाला 140 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतील. होय, या प्लानची नवीन किंमत 599 रुपये आहे.

Amazon Prime Video Plans
Amazon Premium Electronics Days : Amazon चा बंपर सेल, Apple स्मार्टवॉचवर मोठी सूट

दुसरीकडे, इयरली प्लॅन खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने आपल्या या प्लॅनची किंमत वाढवलेली नाही. म्हणजेच जर तुम्ही एक वर्षाचा प्लॅन घेतला तर हा प्लान आजही 1499 रुपयांचा आहे.

त्याच वेळी, कंपनीने Amazon Prime Lite च्या वार्षिक प्लॅनच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आधी हा प्लान 999 रुपये होता आणि आताही या प्लानची किंमत तशीच आहे. याचा अर्थ कंपनीने इयरली प्लॅन असलेल्यांना दिलासा देताना केवळ मंथली आणि 3 महिन्यांच्या प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com