Amazon Sale : OnePlus 11 5G वर 7 हजार रुपयांची प्रचंड सूट! 4 हजार रुपये किमतीचे बड्सही अगदी फ्री

हँडसेटसोबत केवळ डिस्काउंटच नाही तर फ्री इयरबड्सही
Amazon Sale
Amazon Saleesakal

Amazon Sale : Amazon Great Indian Festival Sale मध्ये OnePlus 11 5G स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. जर तुम्हाला महागडा फ्लॅगशिप फोन स्वस्तात घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला OnePlus च्या या डिव्हाइसवर उपलब्ध डीलबद्दल माहिती घ्यायलाच हवी. या हँडसेटसोबत केवळ डिस्काउंटच नाही तर फ्री इयरबड्सही दिले जात आहेत.

Amazon Great Indian Festival Sale ची सुरुवात झाली आहे. सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस सूट दिली जात असली तरी आज आम्ही तुमच्यासाठी OnePlus स्मार्टफोनवर उपलब्ध सर्वोत्तम डील घेऊन आलो आहोत. OnePlus चा फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5G 7 हजार रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.याचा अर्थ असा की Amazon Sale 2023 मध्ये, तुम्ही फ्लॅगशिप फीचर्स सह OnePlus 11 5G मोबाईल स्वस्तात खरेदी करू शकाल. आम्ही तुम्हाला Amazon सेलमध्ये उपलब्ध असलेल्या या सर्वोत्तम डीलबद्दल माहिती देऊ.

Amazon Sale
Health Tips : मलेरिया-डेंग्यूची वाढतेय साथ; आजारी पडल्यानंतर कामी येतील बाबा रामदेव यांच्या 'या' टिप्स

OnePlus 11 5G ची भारतातील किंमत

या वर्षी फेब्रुवारीमध्ये OnePlus ने हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतातील ग्राहकांसाठी लॉन्च केला होता. या डिव्हाइसचा 8GB/128GB व्हेरिएंट 56,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, तर 16GB/256GB स्टोरेज व्हेरिएंट 61,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

Amazon Sale
Mental health : आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर काय करावं?

परंतु आता ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये या हँडसेटवर उत्तम ऑफर आहेत, तुम्ही या डिव्हाइसवर कूपन डिस्काउंटद्वारे 4,000 रुपये आणि बँक कार्ड डिस्काउंटद्वारे 3,000 रुपये वाचवू शकता. Amazon किंवा OnePlus च्या अधिकृत साइटला भेट देऊन तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकता.म्हणजेच हा OnePlus फोन 7 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. याशिवाय 3,999 रुपये किमतीचे वनप्लस बड्सही मोफत मिळतील.

Amazon Sale
World Mental Health Day 2023: कामाच्या तणावामुळे मानसिक आरोग्यावरही होतो वाईट परिणाम, अशा प्रकारे करा स्वतःचा बचाव

OnePlus 11 5G फीचर्स

120 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट व्यतिरिक्त, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर, थर्ड जनरेशन हॅसलब्लॅड कॅमेरा, डॉल्बी व्हिजन एचडीआर आणि डॉल्बी अॅटमॉस सारखी फ्लॅगशिप फीचर देखील या फोनमध्ये देण्यात आली आहेत.

Amazon Sale
World Mental Health Day : निदान मानसिक आरोग्य व्यवस्थेचे

फोनमध्ये 5000 mAh बॅटरी दिली आहे जी 100 वॅट सुपरव्हीओओसी फास्ट चार्जला सपोर्ट करते. फोनच्या मागील बाजूस 50MP Sony IMX581 कॅमेरा सेन्सर सोबत 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 32MP टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com