Android 13 : सिमकार्ड झंझट संपणार! लवकरच एका फोनमध्ये चालणार तीन नंबर

android 13 may allow using multiple mobile numbers on one phone
android 13 may allow using multiple mobile numbers on one phone Sakal

गेल्या तीन-चार वर्षांत फोनमधील सिमकार्ड वापरण्याची पद्धत बदलली आहे आणि हे ई-सिम कार्डमुळे घडले आहे. फिजिकल सिम कार्ड आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान Android 13 जी Google च्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमची पुढील आवृत्ती असणार आहे ती सध्या विकसित केली जात आहे. याच अनेक नवीन फीचर देण्याची कंपनी तयारी करत आहे. जसे की यामध्ये सिम कार्ड न बदलता एका फोनवर अनेक फोन नंबर वापरता येतील..

काळनुसार फोन स्लिम होत गेले आणि सिमकार्ड मिनीवरून मायक्रो आणि ई-सिमवर आले. ई-सिमची सर्वात मोठी समस्या ड्युअल सिमची आहे, परंतु Google Android 13 सह ही समस्या सोडवणार आहे. अँड्रॉइड पोलिसच्या रिपोर्टनुसार, अँड्रॉइड 13 च्या लेटेस्ट कोडमध्ये मल्टीपल इनेबल्ड प्रोफाइल (MEP) नावाचे एक नवीन फीचरवर काम करत आहे. Google ने 2020 मध्ये या तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आणि शेवटी ते Android 13 मध्ये लागू करण्याची योजना आखत आहे. मुळात Android मधील MEP कदाचित एकाच eSIM वर एकाधिक सिम प्रोफाइल देण्याची सिस्टीम असू शकते. ज्यामुळे एकाच वेळी दोन नेटवर्क वापरण्यासाठी दोन वेगळे सिम कार्ड किंवा दोन eSIM कार्ड वापरण्याची आवश्यकता राहणार नाही.

कोणताही फोन केवळ eSIM ला सपोर्ट देत नसेल, तसेच फिजिकल सिम कार्ड स्लॉट असलेल्या फोनवर हे फीचर लागू केले असल्यास, वापरकर्त्याला फोनवर तीन मोबाइल नेटवर्क वापरता येतील. परंतु, त्याच वेळी, सध्याच्या फोनमध्ये एकाच वेळी तीन नेटवर्कला सपोर्ट करण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे या फीचरसाठी सध्याचे भौतिक सिम कार्ड स्लॉट eSIM ने रिप्लेस केले जाऊ शकतात. दोन नेटवर्कसाठी eSIM वापरल्याने वापरकर्त्यांना दोन मोबाइल नंबर वापरण्याची गरज राहणार नाही, तसेच हार्डवेअर कंपोनंटसाठी फोनमध्ये अधिक स्पेस तयार करता येईल.

android 13 may allow using multiple mobile numbers on one phone
स्वस्तात मस्त! 8 हजारांपेक्षा कमीत मिळतात हे तीन स्मर्टफोन; पाहा डिटेल्स

सोप्या भाषेत सांगायचे तर एमईपीच्या मदतीने एकाच एमईपीवर दोन कंपन्यांचे सिम सुरु केले जाऊ शकतात. जर Google ने Android 13 सह हे फीचर जारी केले, तर तुम्ही एकाच फोनमध्ये एकाच वेळी तीन सिम कार्ड वापरू शकाल. आगामी काळात, फ्लॅगशिप फोनमध्ये तीन सिम कार्ड सपोर्ट दिला जाऊ शकतो ज्यामध्ये एक फिजिकल सिम असेल आणि इतर दोन ई-सिम असतील. Android 13 ची बीटा आवृत्ती या महिन्याच्या अखेरीस रिलीज होऊ शकते. अंतिम अपडेट जुलैमध्ये रिलीज होऊ शकतो.

Android 13 कोडमध्ये आढळलेले मल्टिपल इनेबल प्रोफाईल फीचर त्याची चाचणी कितपत यशस्वी होते यावर अवलंबून ते स्टेबल व्हर्जनवर येऊ शकते किंवा नाही ते ठरेल. असं असलं तरी, यासारखे फीचर्स ग्राहक आणि मोबाइल उत्पादक दोघांनाही फायदेशीर ठरू शकते.

android 13 may allow using multiple mobile numbers on one phone
एलन मस्क यांची ट्विटरमध्ये गुंतवणूक; विकत घेतले 'इतके' शेअर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com