हेडफोन जॅक काम करत नाही? वापरा 'या' ट्रिक्स

हेडफोन जॅक काम करत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही.
हेडफोन जॅक काम करत नाही? वापरा 'या' ट्रिक्स
Summary

जर स्मार्टफोनचे हेडफोन जॅक काम करत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. मात्र या ट्रिक्सच्या मदतीने हा प्राब्लेम ठीक करू शकता.

जेव्हा स्मार्टफोनचे हेडफोन जॅक (Android Phone Headphone Jack)काम करत नाही तेव्हा समस्या वाढते. आजकाल प्रत्येकाला गाणी ऐकण्यासाठी किंवा काम करण्यासाठी हेडफोनची (Headphone)आवश्यकता आहे. बर्‍याच वेळा असे घडते जेव्हा स्मार्टफोनचे हेडफोन जॅक चांगला दिसतो. मात्र जेव्हा आपण तो वापरण्यासाठी जातो तेव्हा आवाज येत नाही. हेडफोन वापरणार्‍या लोकांना बर्‍याचदा अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा अशा समस्या पुन्हा पुन्हा घडतात तेव्हा चिडचिड होते. बऱ्याचदा असे होते की, हेडफोन जॅक खराब असतो असे नाही . कधीकधी अशा समस्या स्मार्टफोनच्या चार्जिंग जॅकमध्ये ही असू शकतात. यामागे बरीच कारणे असू शकतात. आज आपण ज्यामुळे या समस्यां निर्माण होतात त्याविषयी माहिती जाणून घेऊया. (Android-phone-headphone-jack-not-work-try-these-tricks-latest-science-and-technology-marathi-news-akb84)

तुमचा हेडफोन तुटलेला आहे का?

हेडफोन जॅक का काम करत नाही हे समजण्यासाठी समस्या नेमकी कोठे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. हेडफोन्समध्ये काहीही चूक नाही. हे तपासण्यासाठी, आपण वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये हेडफोन्स ठेवून एकदा तपासावे. लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन यासारख्या डिव्‍हाइसेसची तपासणी करा. जर हेडफोन इतर डिव्‍हाइसेसवर देखील काम करीत नसेल तर याचा अर्थ असा आहे की ते खराब झाले आहे. अशावेळी ते बदला आणि नवीन घ्या.

हेडफोन जॅक साफ करणे देखील महत्वाचे आहे

बर्‍याचदा फोनच्या हेडफोन जॅकमध्ये माती असते. ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. म्हणून वेळोवेळी ते साफ करणे फार महत्वाचे आहे. कधीकधी त्यात धूळ अडकल्यामुळे हेडफोन काम करत नाही. हेडफोन आणि जॅकचे कनेक्शन ब्लॉक करते.अशा परिस्थितीत आपण पहिल्यांदा हेडफोन (ईयरफोन खराब असू शकतो) जॅक तपासला पाहिजे. त्यात काही धूळ दिसली असेल तर ताबडतोब स्वच्छ करा. यासाठी आपल्याला कोणताही लिक्विड क्लीनर वापरण्याची आवश्यकता नाही. कोरड्या आणि पातळ ब्रशच्या सहाय्याने ते स्वच्छ केले जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास दोन ते तीन वेळा जोरात फुंकून घ्या. यामुळे मातीही बाहेर येईल.

हेडफोन कनेक्ट करण्यापूर्वी डिव्हाइस चेक करा

बर्‍याच वेळा स्मार्टफोनमध्ये कनेक्ट केलेला वायरलेस ब्लूटूथ किंवा स्पीकर किंवा इतर डिव्हाइसशी जेव्हा आपण हेडफोन कनेक्ट करतो तेव्हा आवाज येत नाही. म्हणून जेव्हा आपण डिव्हाइसवर हेडफोन्स कनेक्ट करीत असाल तेव्हा त्यापूर्वी ब्लूटूथ डिस्कनेक्ट करा. बर्‍याच वेळा असे घडते की, दुसऱ्याचा ब्लूटूथ कनेक्ट होतो. अशा वेळी जेव्हा आपण हेडफोन कनेक्ट करतो. तेव्हा आवाज येत नाही. म्हणून पहिल्यांदा चेक करून घ्या. डिव्हाइसमध्ये कोणाचा ब्लूटूथ कनेक्ट आहे का? अशावेळी पॅनिक न होता समस्या सहजपणे सोडविली जाऊ शकते.

हेडफोन जॅकला पाणी आणि ओलावापासून वाचवा

केवळ मातीच नाही तर स्मार्टफोनच्या हेडफोन जॅकमध्ये पाणी शिरले तर ते काम करणे पूर्णपणे थांबवते. म्हणून केवळ पाण्यापासूनच नव्हे तर आर्द्रतेपासून देखील त्याचे संरक्षण करा. पावसाळ्यात आपण आपला स्मार्टफोन कसा ठेवता यावर विशेष लक्ष द्या. पाण्याचा थेंबदेखील हेडफोन जॅकवर परिणाम करू शकतो. फक्त स्मार्टफोनवरच नाही. या व्यतिरिक्त, स्मार्टफोनच्या हेडफोन जॅकमध्ये काही समस्या आढळल्यास तत्काळ मॅकेनिकला दाखवा.

एकदा ऑडिओ सेटिंग्जवर जाऊन चेक करा

असेही होऊ शकते की प्राब्लेम जॅक किंवा हेडफोनमध्ये नसून सेटिंग्जमध्ये असतो. जर अशी परिस्थिती असेल तर ती सहजपणे सोडविली जाऊ शकते,.यासाठी आपण डिव्हाइसची ऑडिओ सेटिंग्ज उघडा आणि वॉल्यूम लेवल तपासा. कदाचित हे म्यूट होण्याची शक्यता असू शकते. या कारणानेमुळे देखिल हेडफोन काम करीत नाही. आपण वापरत असलेले कोणतेही डिव्हाइस, आपण एकदा ऑडिओ सेटिंग्ज तपासल्या पाहिजेत. जर आपल्याला सर्व काही ठीक वाटत असेल आणि तरीही हेडफोन्स काम करत नसेल तर ताबडतोब डिव्हाइस बंद करा आणि ते पुन्हा सुरू करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com