हा आहे जगातील सर्वात 'स्मार्ट किटक'; उचलू शकतो स्वतःच्या वजनापेक्षा तब्बल ५०० पट वजन; वाचाल तर व्हाल थक्क 

Ants are the smartest insect in the world
Ants are the smartest insect in the world

नागपूर : तुम्ही कधी तुमच्या वजनापेक्षा जास्त वजन असलेली वस्तू उचलली आहे का? जर तुमचं उत्तर 'हो' असेल तर ही वस्तू घेऊन तुम्ही डोंगर सर करू शकता? नाही ना.  पण या पृथ्वितलावर अशाही काही कीटकांच्या प्रजाती आहेत ज्या आपल्या वजनापेक्षा तब्बल ५०- ५०० पट वजन सहज उचलून लांब अंतर पार करू शकतात. आश्चर्य वाटलं ना? चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा कीटक. 

हा किटक तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी आढळतो. एक नाही दोन नाही तर आपल्या घरी शेकडोच्या संख्येत हा किटक असतो. हो बरोबर. आम्ही  आपल्या परिचयाच्या लाल आणि काळ्या मुंग्यांबद्दलच बोलत आहोत.  'मूर्ती लहान पण कीर्ती महान' अशी म्हण नेहमीच मुंग्यांबद्दल वापरली जाते. ते अगदी खरंही आहे.  खरंतर मुंगी म्हंटलं की आपल्या अंगावर काटा येतो. मात्र याच मुंग्यांचे काही वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घेऊ मुंग्यांबद्दलच्या काही खास आणि आश्चर्यजनक गोष्टी. 

जगभरात सर्वत्र आढळतात मुंग्या 

मुंगी हा असा किटक आहे जो जगभरात प्रत्येक देशात, राज्यात, शहरात आणि घरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मुंग्या आढळतात. 

ही मुंगी जगते तब्बल २० वर्ष 

आपल्या प्रजातीतील किंवा  समूहातील इतर मुंग्यांना जन्म देणारी मुंगी म्हणजे 'राणी मुंगी'. राणी मुंगी तब्बल ३० वर्षापर्यंत जगते. इतर मुंग्यांच्या तुलनेत तिचे आयुष्य़ तब्बल १०० पटीने जास्त असते.

तब्बल इतक्या प्रजाती 

मुंग्यांमध्ये आपल्याला फक्त लाल आणि काळ्या मुंग्या इतकेच प्रकार माहिती असतील. मात्र जगभरात मुंग्यांच्या तब्बल १३००० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. ०.०२ इंच  ते तब्बल २ इंच पर्यंतच्या मुंग्या जगभरात आढळून येतात. 

सुपर कॉलोनीज

मुंग्यांच्या सर्वात मोठ्या वसाहतीला ‘सुपरकॉलनीज’ म्हणतात. हे मोठे वारूळ तब्बल ३७०० मैल लांब असू शकतं. यात सुमारे १ - २ अब्जपर्यंत मुंग्या राहू शकतात.

उचलू शकतात तब्बल इतके वजन 

‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या एका वैज्ञानिक संशोधनात असे म्हटले आहे की मुंग्या त्यांच्या शरीराच्या सुमारे ५० - ५०० पट जास्त वजन उचलण्यास सक्षम असतात. हे वजन उचलून त्या लांब अंतरही पार करू शकतात. 

मुंग्या असतात धावपटू 

मुंग्या चांगल्या धावपटू्सुद्धा असतात. त्या प्रत्येक सेकंदाला ३ इंच एवढं धावू शकतात. माणसाने जर ही स्पीड पकडली तर तो ताशी तब्बल ५५ किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकेल.

माणसांशी तुलना 

या जगात मुंगी आणि माणूस असे दोन प्राणी आहेत जे स्वतःचं अन्न दीर्घ काळासाठी साठवून ठेवतात. 

जगातील सर्वात स्मार्ट किटक

मुंग्यांच्या इवल्याश्या शरीरात २ लाख ५० हजार मेंदू पेशी असतात. तसंच मुंग्या सरळ रेषेत चालतात. यामागचं विज्ञान असं आहे की प्रत्येक मुंगी आपल्या मागे एक द्रव स्त्रावते. त्यामुळे मागून येणाऱ्या मुंगीला पुढची दिशा समजते. म्हणूनच मुंगी ही सर्वात ‘स्मार्ट’ कीटक आहे.

मुंगीला विमानातून फेकलं तर? 

मुंगीच्या शरीराची बनावट इतकी खास असते की तिला विमानातून फेकलं तरी काही होणार नाही. उंचावरून पडून पुन्हा वर चढणं हा त्यांचा मोठा गुणधर्म असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com