Apple च्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून राजीनाम्याची घोषणा; 'या' दिवशी सोडणार कंपनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Company

अॅबॉट हे 2018 मध्ये 'अॅपल'मध्ये सामील झाले आणि ते iCloud सेवेचं नेतृत्व करत होते.

Apple च्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून राजीनाम्याची घोषणा; 'या' दिवशी सोडणार कंपनी!

'अॅपल'चे वरिष्ठ अधिकारी मायकेल अॅबॉट (Michael Abbott) यांनी राजीनामा जाहीर केला आहे. मायकेल अॅबॉट हे iCloud Service चे प्रभारी आहेत.

मायकेल एप्रिलमध्ये कंपनी सोडणार असल्याचं कळतंय. ब्लूमबर्गनं यासंदर्भात प्रथम माहिती दिलीये. मात्र, अॅपलनं अद्याप या राजीनाम्यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

अॅबॉट हे 2018 मध्ये 'अॅपल'मध्ये सामील झाले आणि ते iCloud सेवेचं नेतृत्व करत होते. iCloud व्यतिरिक्त अॅबॉट हे इमर्जन्सी एसओएस सेवा आणि फाइंड माय ऑन आयफोनचे (Find My on iPhone) प्रभारी होते. अॅपलच्या आधी अॅबॉट यांनी Twitter आणि Palm वर देखील काम केलं आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अॅबॉट यांच्या कामाची जबाबदारी एप्रिलपासून अॅपलचे अभियंता असलेल्या जेफ रॉबिन यांच्या खांद्यावर असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इनसाइडरनं अहवाल दिला की, अॅपलचे सबस्क्रिप्शन मॉडेलचे उपाध्यक्ष पीटर स्टर्न देखील कंपनी सोडणार आहेत. त्यामुळं त्यांची जागा कोण भरुन काढणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.