Apple चा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन

apple confirms that iphone models to switch to usb type c ports
apple confirms that iphone models to switch to usb type c ports

जगभरात आयफोनचे कोट्यावरधी वापरकर्ते आहेत. त्यांच्यासाठी कंपनीने मोठी घोषणा केली आहे. प्रदीर्घ विरोधानंतर, Apple ने शेवटी USB-C चार्जिंग पोर्टचा पर्याय स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलने म्हटले आहे की आगामी iPhones हे टाइप-सी पोर्टसह येतील. त्यामुळे आगामी आयफोन 15 किंवा 16 सीरीज ही टाइप-सी चार्जिंग पोर्टसह ऑफर केली जाईल अशी अपेक्षा आहे.

अॅपलचे मार्केटिंग हेड ग्रेग जोसविक (Greg Joswiak) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Apple च्या iPhone साठी USB-C वर स्विच करण्याच्या योजनेबद्दल विचारले असता, Joswiak म्हणाले, हे स्पष्ट आहे की, आम्हाला त्याचे पालन करावे लागेल, आमच्याकडे पर्याय नाही. महत्वाचे म्हणजे युरोपियन युनियनने 2024 पासून सर्व डिव्हायसेसना टाइप-सी पोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.

apple confirms that iphone models to switch to usb type c ports
Best Recharge Plan: जिओचा सर्वात परवडणारा प्लॅन; फ्री नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओसह मिळतं बरंच काही..

जोसविक यांनी असेही म्हटले आहे की केवळ युरोपियन युनियन देशांमध्येच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये विकल्या जाणार्‍या आयफोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट देखील असतील. अशा स्थितीत अॅपलला भारतीय बाजारपेठेसाठी मोठे बदल करावे लागणार नाहीत, कारण भारत सरकारही कॉमन चार्जरचा विचार करत आहे.

सध्या, Apple चे iPhones आणि iPads लाइटनिंग पोर्टसह येतात, जे Apple चे एक्सक्लुसिव्ह पोर्ट आहे. अॅपलशिवाय अन्य कोणतीही कंपनी या चार्जिंग पोर्टचा वापर करत नाही. नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 14 सीराजसह Type-C पोर्ट देणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.

apple confirms that iphone models to switch to usb type c ports
Amou Haji Died: जगातील 'सर्वात घाणेरडा व्यक्ती'चा मृत्यू; 'या' कारणासाठी ५० वर्षांपासून केली नव्हती अंघोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com