iPhone 16 Launch : टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये iPhone 16ने एंट्री घेतली आणि सर्वत्र खळबळ माजवणारी घोषणा कंपनीने केली आहे. ॲपलने iPhone 16 सीरीज लाँच केल्यानंतर अगदी आश्चर्यकारकपणे 3 जुने पण लोकप्रिय असणारे iPhone मॉडेल बंद केले आहेत. या निर्णयामुळे लाखो Apple वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
नव्या iPhone 16 सीरीजची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. या सीरीजमध्ये पहिल्यांदाच Apple Intelligence (AI) वापरली गेली आहे आणि अनेक महत्त्वपूर्ण अपग्रेड्स देखील केले आहेत.
Apple ने iPhone 16 लाँच झाल्यानंतर iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि iPhone 13 हे तीन मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे 3 मॉडेल आता कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर विकले जाणार नाहीत, परंतु त्यांची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि रिटेल स्टोअर्सवर स्टॉक संपणार नाही तोपर्यंत चालू राहील.
गेल्या वर्षीही कंपनीने iPhone 15 सीरीज लाँच झाल्यानंतर iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max आणि iPhone 13 Plusची विक्री बंद केली होती. तसेच iPhone 14 लाँच झाल्यानंतर iPhone 13 Pro आणि Mini मॉडेलची विक्री बंद केली होती आणि फक्त बेस मॉडेल उपलब्ध होता, जो आता बंद करण्यात आला आहे.
नव्या iPhone 16 सीरीजमध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार मॉडेल आहेत. किमती 79,900 रुपयांपासून सुरू होऊन टॉप व्हर्जन iPhone 16 Pro Max साठी 1,84,900 रुपयांपर्यंत जातात. नव्या सीरीजमध्ये मोठे कॅमेरा अपग्रेड्स आणि AI फीचर्स देखील आहेत. iPhone 16 सीरीजमधील सर्व मॉडेल डिडिकेटेड कॅप्चर बटनसह येतात आणि iPhone 16 आणि iPhone 16 Plusचा डिझाइन अपडेट करण्यात आला आहे.
नव्या iPhone सीरीज लाँच झाल्यानंतर कंपनीने आता काही जुने मॉडेल स्वस्त केले आहेत. iPhone 15 आणि iPhone 14 मॉडेलमध्ये 10,000 रुपयांपर्यंतची किंमत कमी करण्यात आली आहे. iPhone 15 ची किंमत आता 10,000 रुपयांनी कमी करून 69,900 रुपये करण्यात आली आहे. तसेच iPhone 15 Plusची किंमतही 10,000 रुपयांनी कमी करून 79,900 रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे iPhone 14 ची किंमतही 10,000 रुपयांनी कमी करून 59,900 रुपये करण्यात आली आहे. तसेच iPhone 14 Plusची किंमतही 10,000 रुपयांनी कमी करून 69,900 रुपये करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.